घरी जाऊन साजरा केला वाढदिवस,वाठोडा पोलीस स्टेशनने साजरा केला एकाच परिवारातील 3 सदस्यांचा वाढदिवस साजरा
नागपूरात कोरेनाचे वाढते रुग्ण बघता नागपूर पोलिसांतर्फे नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करीत आहे । त्यातच नागपूर पोलिसांनी राबविलेल्या विविध सामाजिक कामगिरीने नागरिकांमध्ये पोलिसांप्रती आपुलकीची भावना निर्माण झाली आहे ।
त्यामुळेच की काय नागपूरातील वाठोडा पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू ढेरे यांना त्यांचाच हद्दीतील एका 8 वर्षीय जिनीक्षा जारुंडे या चिमुकलीने फोन केला आणि आमच्या घरातील 3 जणांचा आज वाढदिवस असून बाहेर केक घेण्यासाठी जाऊ शकतो का ।
ही विचारणा करताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू ढेरे यांनी स्वतः त्यांचासाठी 3 केक घेऊन थेट त्या चिमुकलींच्या घरी पोहचले । आणि चिमुकली सह तिच्या 2 वर्षीय भाऊ मयंक आणि आजोबा दिलीप जारुंडे यांचा वाढदिवस घरासमोरच सोशल डिस्टनिंग पाळीत आणि टाळ्या वाजवून साजरा केला ।
यावेळी या चिमुकलींच्या घराजवळ राहणाऱ्यांनाही चक्क पोलीस निरीक्षक सह इतर जवानांना पाहताच नागपूर पोलिसांचे मनापासून कौतुक केले । माझे 8 वर्षात 8 वाढदिवस साजरे झाले परंतु पहिल्यांदा पोलिसांनी माझा वाढदिवस स्वतः केक आणून साजरा केल्याने हा प्रसंग मी कधीच विसरणार नसल्याची प्रतिक्रिया 8 वर्षीय जिनीक्षा जारुंडे ह्या चिमुकलीने दिली आहे ।
तर वाठोडा पोलीस नागरिकांसाठी असून आमच्यावर नागरिकांनी दाखविलेला विश्वास आमच्यासाठी महत्वाचे असल्याने आम्ही एकाच कुटुंबातील 3 जणांचा वाढदिवस साजरा केला आहे । नागरिकांचा आनंदात वाठोडा पोलीस नेहमीच सहभागी राहणार असून सर्वांनी कायद्याचे पालन करावे आणि नागपूर पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन ही वाठोडा पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू ढेरे यांनी नागरिकांना केले आहे
- बापू ढेरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाठोडा पो. स्टे. नागपूर
- जिनीक्षा जारुंडे, नागपूर