Nagpur Local
कोंबड्या मेल्या पण बर्ड फ्लू कि डिजे च्या आवाजाने?
नागपूर:- राज्य बर्ड फ्लू च्या शिरकावाने दहशतीत आहे अशात आता नागपूरात डि जे च्या आवाजाने कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची विचित्र घटना समोर आलीय.
अधिकृत पुष्टी होऊ शकली नसली तरी पशुसंवर्धन विभागाकडून त्यांचा मृत्यू डि जे च्या दनदनाट आवाजाने झाला असल्याचा दावा करण्यात येत आहे.
कळमेश्वरच्या परिसरात उदगी फार्मवर हा प्रकार घडला. या परिसरात जोरदार आवाजात डि जे वाजवला गेल्याचे तपासांती कळले, फॉर्ममधील कोंबड्या आवाजाने घाबरल्या व सैरावैरा पळू लागल्या. चेंगराचेंगरीत तब्बल अडिचशे कोंबड्या मृत्युमूखी पडल्या.
राज्यात सुरू बर्ड फ्लू ची संक्रमनामुळे या कोंबड्यांनाही तशी लागण झाली होती का अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे
त्यामुळे या मृत वर्षांत तपासणीसाठी पाठवण्यात आले तोपर्यंत परिषद प्रशासनाकडून फॉर्म संचालकांस दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या