मुख्य न्यायमूर्ती शरद बोबडे आज उपराजधानीत: न्याय कौशल ई-रिसोर्सचे 31 ऑक्टोबर रोजी करतील उद्घाटन
नागपूर: न्यायव्यवस्थेला गती देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या देशातील पहिले न्याय कौशल्य ई-रिसोर्स सेंटरचे उद्घाटन शनिवारी 31 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते होणार आहे. बोबडे महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे आज पोहोचत आहेत. उल्लेखनीय आहे की या केंद्राच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालय मार्फत ऑनलाईन माध्यमातून याचिका दाखल करता येईल.
सरन्यायाधीश शरद बोबडे गुरुवारी ४ दिवसांच्या नागपूर दौर्यावर येत आहेत. शनिवारी ३१ ऑक्टोबर रोजी “ज्योति” judicial officers training institutes(न्यायिक अधिकारी प्रशिक्षण संस्था) येथे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राज्य परिवहन विभागाच्या आभासी कोर्टाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते होईल.
या कार्यक्रमादरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता, न्या. ए.ए. सईद, न्या. रवी देशपांडे, न्या. नितीन जमादार, न्या. सुनील शुक्रे हे प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शरद बोबडे गुरुवारी सकाळी 10:15 वाजता नागपुरात दाखल होतील. त्यांचा चार दिवस नागपुरातच मुक्काम राहील. ते रविवारी दिल्लीला रवाना होतील. गुरुवारी सकाळी 11 वाजता सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती भूषण गवई देखील नागपूरला पोहोचतील. ते शनिवारी ३१ ऑक्टोबरला महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठाच्या उच्च न्यायालयाच्या कार्यकारी परिषद इमारत समितीच्या बैठकीस उपस्थित राहतील.