लकडगंज झोन मधील २ जलकुंभ आणि नेहरू नगर मधील २ जलकुंभाची स्वच्छता जाने ३०, ३१ आणि फेब्रु २ आणि ३ रोजी
नागपूर, जानेवारी 28: नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी आपल्या स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा करण्याच्या वचनबद्धतेला अनुसरत दरवर्षीप्रमाणे आपली विशेष वार्षिक जलकुंभ स्वच्छता मोहीम-२०२२-२३ सुरु केलीली आहे. पुढील आठवड्यात या अंतर्गत लकडगंज झोन मधील २ जलकुंभ; लकडगंज-१ जलकुंभ (सोमवारी) जानेवारी ३० आणि लकडगंज २ जलकुंभ (मंगळवारी) जानेवारी ३१ रोजी तर नेहरू नगर झोन मधील २ जलकुंभ ; नंदनवन (राजीव गांधी जलकुंभ) गुरुवारी, फेब्रुवारी २ आणि नंदनवन नवीन जलकुंभ (शुक्रवारी ), फेब्रुवारी ३ , २०२३ रोजी स्वच्छ करण्यात येणार आहे.
मनपा-OCW दरवर्षीच नागपुरातील सर्व जलकुंभ वर्षातून एकदा स्वच्छता करीत असते. हि परंपरा मनपा-OCW ने गेल्या २०१२ पासून दरवर्षी नित्यनियमाने सुरु केलेली आहे. सर्व जलकुंभ सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान, फक्त ८ तासात मनपा- मनपा-OCW च्या अत्याधुनिक प्रणाली द्वारे स्वच्छ करण्यात येतात.
या जलकुंभ स्वच्छतेमुळे तेथील भागात दिलेल्या तारखेनुसार पाणीपुरवठा बाधित राहील., टँकर द्वारे देखील पाणीपुरवठा ह्या दरम्यान शक्य होणार नाही .तरीही नागरिकांनी आपल्या परिवाराच्या वापराकरिता पुरेसा पाणी साठा करून ठेवावा हि विनंती