रहाटे चौक महामेट्रो स्थानक पुर्णत्वास, गो-ग्रिनचा नयनाभिराम देखावा
नागपूर:- महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरला ग्रीन सिटी असे म्हणतात. वेगाने वाढणारं आपलं महानगर घोडदौड करत असूनही नागपूरने आपला हिरवळीचा बाज कायम ठेवला आहे. आता आपण नागपूर मेट्रोच्या प्रवासादरम्यानही या महानगराच्या ग्रीनरीला भेट देऊ शकता.
महा मेट्रोने सोमवारी काही उत्तम छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. रहाटे कॉलनीचे मेट्रो स्टेशन हिरवळगार वातावरणात कसे बांधले जाते हे यातून निदर्शीत होत आहे.
काही कालावधीपुर्विच रहाटे कॉलनी मेट्रो स्टेशनची सुंदर रचना बनवत या स्टेशनचे काम पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी या परिसरातील हिरवळ पाहता स्थानकाची ही रचना अंतिम केली होती. व तद्नुसार काम आखले व पुर्ण केले गेले
उल्लेखनीय आहे की नागपूर मेट्रोची बहुतेक स्थानके अशाच प्रकारे हिरवळीच्या थिमचे आसपास बांधली आहेत. या कारणामुळे जेव्हाही आपण मेट्रोमध्ये प्रवास कराल तेव्हा तुम्हाला नागपूरच्या हिरव्यागार छटांची झुळूक खिडकीतून मिळेल.