सकाळपासूनच संततधार सुरू, सतर्कतेची साद
नागपुर:- शहरात रविवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे. पाऊस आणि आधी वाच विश्रांती घेतलेली नाही तरी पावसामुळे उदभवणाऱ्या कुठल्याही आपतकालीन परिस्थितीवर तात्काळ नियंत्रण मिळविता यावे यासाठी मनपा मुख्यालयातील अटलबिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर येथे ‘इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर’ उभारण्यात आले आहे.
संपूर्ण शहरभरात लागलेल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून परिस्थितीचे निरीक्षण करण्यात येते. शहरातून आलेल्या नागरिकांच्या कॉल्सची दखल घेत तात्काळ कार्यवाही केली जाते. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज येथून पावसाळी परिस्थितीची पाहणी केली. व या केंद्रातून होत असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला.
शहरात कुठे रस्त्यांवर जास्त प्रमाणात पाणी साचले असेल अथवा खोलगट वस्त्यांत पाणी साठले असेल तिथे मदतचमू पाठवून तत्परतेने कार्य येथून संचालित होते. अनेक इमारतींच्या तळ भागात अशा संततधारेणे जलभराव होत असतो व नुकसान होते. नागरिकांनी विनंती कॉल केल्यास त्वरित मदत कार्य सुरू होऊन संभाव्य अडचणींवर मात करता येते.