दिवसभर संततधार: फुटाळ्यावर फुलला जमाव
नागपूर:- बर्याच दिवसांनंतर शहरावर मेघकृपा बरसली. तसा पाऊस रोजच पडत होता, परंतु रविवारी सकाळीपासून तो संध्याकाळी उशिरापर्यंत जो बरसला ती संततधार काही औरच. मधे काही मिनिटे अधे मधे त्यात जोरही वाढत होता. हा ट्रेंड दिवसभरच चालू राहिला आणि सूर्यमुख दुर्लभ होऊन बसले. संध्याकाळी पाऊस जरा कमी झाल्याने, आनंददायी वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने तरुणाई फुटाळा तलाव परिसरास पोचले.
सुखद सेल्फीज्: मनोहारी मोसमात फुललेली तरूणाई सेल्फीजचा आनंद घेतांना आढळली. हवामान खात्याने सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात 18.6 मिमी पावसाची नोंद केली. तापमानातही लक्षणीय घट झाल्याने थंडावा वाढला.
विभागाने शहरातील कमाल तापमान 26.5 डिग्री नोंदविले, जे सरासरीपेक्षा 4.1 अंश कमी होते. किमान तापमान 24.7 अंश नोंदविले गेले. दिवसाआधी शहरातील कमाल तापमानात 30.7 अंश नोंद झाली होती.
13 ऑगस्टपर्यंत शहराचे हवामान असेच राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. ढगाळ हवामानासह काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 14 आणि 15 ऑगस्टला हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
साधारणत: संपूर्ण विदर्भात हेच वातावरण आहे. बर्याच दिवसाच्या दडीनंतर पावसाने सुर मारल्याने शहरातील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. लोकांनी घरातच राहून रविवारचा आनंद लुटला. गरम पकोडे, नाश्ता, चहा-कॉफीसह हवामानाचा आनंद लुटला.