अधिवेशनाची वाचलेली खर्च रक्कम आरोग्ययंत्रणा बळकटीस वळवा: आ. विकास ठाकरे
नागपूर:- काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नागपुरातील विधानसभेचे हिवाळी अधिवेशन हे नागपुरात होणार नसून मुंबईला होणार यावर शिक्कामोर्तब झाले असून त्या अनुषंगाने अधिवेशनावर होणारा तब्बल 50 कोटींचा खर्च वाचला आहे.
मुख्यमंत्र्यांचे या निर्णयाचे स्वागत करत, 50 कोटींच्या या वाचलेल्या खर्च निधीची रक्कम विदर्भ व उपराजधानीतील आरोग्य यंत्रणा बळकटीस वळवावी असे काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मागणी केली असल्याची माहिती दिली.
येत्या 7 डिसेंबर पासून सुरू होणारे हे हिवाळी अधिवेशन कोरोना महामारी च्या पार्श्वभुमीवर रद्द करण्यात यावे अशी मागणी आधीच मुख्यमंत्र्यांकडे केली होती. महाराष्ट्रासह उपराजधानीत कोरोना लाटेच्या संभावीत शक्यतेचा विचार करता शासकीय यंत्रणांपुढे आधिच बरीच आव्हाने आहेत, अशा परिस्थितित अधिवेशनावर खर्च होणारी अंदाजीत 50 कोटींची रक्कम उपराजधानीतील रूग्णालय व आरोग्य यंत्रणेवर खर्च केली जाऊन येणा-या संभाव्य धोक्यास अधिक सजगतेने लढा देता येईल असे ते म्हणाले