कारपोरेट कंपनी यांनी कोरोनावर नियंत्रण करायला मदत करावी : आयुक्त
नागपूर स्मार्ट ॲन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कारपोरेशन लिमिटेडच्या वतीने स्टेक होल्डर्स मीटचे श्रृंखला अंतर्गत शहरातील सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील कारपोरेट कंपनीची सभा शनिवारी स्मार्ट सिटीचे कॉफ्रेस हॉल मनपाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतमध्ये करण्यात आले होते.
मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त श्री. जलज शर्मा, स्मार्ट सिटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. महेश मोरोणे व विविध कंपन्यांचे प्रमुख अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
कारपोरेट कंपन्यांचे प्रतिनिधी यांना संबोधित करताना श्री. राधाकृष्णन बी. म्हणाले की, नागपूरचा विकास करण्यासाठी सगळयांना सोबत येण्याची गरज आहे. शहराचे विकासासाठी कारपोरेटसनी त्यांचे सी.एस.आर चा निधी उपयोग करुन शहरातील कोविडची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आणि नागपूर शहराला लाईव्हली, सेफ, सस्टेनेबल व हेल्दी शहर करण्याच्या दृष्टीने भरघोस मदत करण्याचे आवाहन केले. त्यांनी १८ कि.मी. चे रस्त्यावर डेडीकेटेड बायसिकल लेन तयार करण्याचे स्मार्ट सिटीचे प्रस्तावाची प्रशंसा केली. ही व्यवस्था नागपूरच्या नागरिकांना निरोगी ठेवण्यासाठी उत्तम ठरेल, असे ही त्यांनी सांगीतले.
यापूर्वी सी.ई.ओ. श्री. महेश मोरोणे यांना कंपनीचे प्रतिनिधी समोर स्मार्ट सिटीस्ज् मिशन अंतर्गत नागपूर शहरात राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांचे सादरीकरण केले. स्मार्ट सिटीस्ज् मिशन केंद्र शासनाचे गृह निर्माण व शहरी विकास मंत्रालयाने २०१५ मध्ये सुरु केले आहे. नागपूरचा देशातील १०० शहरांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यांनी सांगितले की, स्मार्ट सिटीस्ज् मिशन अंतर्गत केंद्र शासनाने इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज हा उपक्रम सुरु केला आहे. हा कार्यक्रम तीन टप्प्यामध्ये राबविण्यात येणार आहे. प्रथम चरणामध्ये नागपूरात लहान-लहान उपाय करुन सायकलिंग ला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. सोबतच नागरिकांमध्ये वातावरण निमिर्ती करुन त्यांना रोजचे कामांसाठी सायकलचा वापर करण्यासाठी प्रवृत केले जात आहे. नागपूरात सायकल चालविण्या योग्य १८ कि.मी. रस्त्यांवरती डेडीकेटेड बायसिकल लेन तयार करण्यात येणार आहे. शहरातील जास्तीत-जास्त नागरिकांनी सायकलला प्राधान्य दयावे यासाठी उपाययोजना केल्या जात आहे. या दृष्टने नागपूर शहराने स्मार्ट सिटीच्या माध्यमातून हॅन्डल बार सर्व्हे व्दारा एका आठवडयात १८ कि.मी. चे रस्ते सायकलिंग साठी निश्चित केले व या रस्त्यांवर स्मार्ट सिटीचा एकही पैसा खर्च न करता सी.एस.आर. निधीतून दोन कोटी किंमतीचे काम करण्यात येणार आहे. असे त्यांनी नमूद केले.
स्मार्ट सिटीच्या कार्याची दखल घेवून दि. ४ सप्टेंबर रोजी केंद्र शासनाचे गृह निर्माण व शहरी विकास मंत्रालय व आय.टी.डी.पी. यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित वेबीनारमध्ये स्मार्ट सिटीचे सीईओ श्री. महेश मोरोणे यांना सादरीकरणासाठी व याव्दारे इतर शहरांना ही माहिती देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते, हे विशेष. आय.टी.डी.पी.च्या मोबीलीटी क्षेत्रातील तज्ञ अस्वथी दिलीप व श्रेया गाडेपल्ली यांनी नगापूरमध्ये इंडीया सायकल्स् फॉर चेंज चॅलेंज अंतर्गत इतक्या कमी कालावधीत कौतुकास्पद कामगिरी केल्याने श्री. मोरोणे यांचे अभिनंदन केले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. जलज शर्मा यांच्या हस्ते दहा सायकली सी.एस.आर. निधी मधून देणारे फन प्लॅनेट चे श्री. रुपचंद गोपलानी व श्री. जितू गोपलानी यांचा सत्कार करण्यात आला.
बैठकीत उपस्थित विदर्भ इंफोटेक कंपनीचे सीएमडी प्रशांत उगेमुगे यांनी रुपये दहा लक्ष त्यांच्या कंपनीच्या सी.एस.आर निधीतून देण्याची घोषणा केली. त्याप्रमाणे आय.टी पार्क मधील पर्सिस्टंट सिस्टमचे मुख्य अधिकारी श्री. समीर बेंद्रे हे काही कारणाने उपस्थित राहू शकले नसले तरी कोविडचे कामासाठी व सायकल ट्रॅक साठी भरघोस मदत त्यांचे कंपनीचे सी.एस.आर. धोरणा अंतर्गत करण्याचे श्री. मोरोणे यांना आश्वासन दिले. यासोबतच एल.ॲन्ड टी कंपनीने सुध्दा भरघोस मदत देण्याचे जाहिर केले. इतर कंपन्यांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याकडे याबाबतचे लेखी प्रस्ताव पाठवल्यास कंपनीच्या धोरणानुसार सी.एस.आर अंतर्गत मदत करण्याचे आश्वासन दिले.
टाटा एडवांन्स सिस्टम, ओ.सी.डब्ल्यू, सोलर इंडस्ट्रीज इंडीया लिमिटेड, इंडीयन ऑइल कॉ.लि., बीपीसीएल, प्लास्टो टॅक प्रा.लि. वेकोली, एजी एनवायरो इंफ्रा प्रोजेक्टस् प्रा.लि., आय.सी.आय.सी.आय बॅकचे प्रतिनिधी तसेच इन्स्पायर या ॲपलचे शो रुमचे मालक शंतनु गद्रे उपस्थित होते. श्री. राधाकृष्णन बी., श्री. जलज शर्मा व श्री. मोरोणे यांनी उपस्थित सर्व कंपनीच्या प्रतिनिधींचे अभिनंदन केले.
स्मार्ट सिटीचे अधिकारी श्रीमती भानुप्रिया ठाकुर, डॉ . अर्चना अडखड, राजेश दुपारे, डॉ. प्रणिता उमरेडकर, अधि. मनजीत नेवारे, डॉ. शील घुले, राहुल पांडे, मोईन हसन, बाससिकल मेयर, दीपांती पाल, मनीष सोनी, श्रीकांत अहीरकर, अमित शिरपुरकर, डॉ. पराग अर्मल आणि परिमल इनामदार आदी उपस्थित होते.