कोरोना: पोलिस उपनिरीक्षक आणि हेडकॉस्टेबलचा मृत्यु, पोलिस दलात खळबळ
नागपूर:- एकिकडे शहरात कोरोनाचे रुग्ण सतत वाढत असतांनाच आता नागपुर पोलिस दलात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक भगवान शेजुळे आणि धंतोली पोलीस ठाण्यातील पोलीस हेडकोंस्टेबल सिद्धार्थ सहारे यांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.
दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर नागपुरातील मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू होते, नागपूरात कोरोनामुळं पहिल्यादाच एका पोलिस उपनिरीक्षकासह हेडकॉस्टेबलचा बळी गेल्याने नागपुर पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे
या दुःखद घटनेनंतर नागपुर पोलिसांनी अधिक खबरदारी घेण्याचे ठरविले असून कर्त्यव्यावर असतांना पोलिस अधिकारी आणि कर्मचार्यांनी अधिक सतर्कता बाळगण्याची आणि कोरोनाचे लक्षण दिसताच चाचणी करून घेण्याच्या सूचना आज सर्व पोलिसांना देण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त नीलेश भरणे यांनी दिली.
नागपूरात काल तब्बल 558 लोकांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या होत्या,नागपूरात आतापर्यंत 7041 लोकांना कोरोनाची लागण झाली असून, आतापर्यंत जिल्ह्यात 204 रुग्णांचा कोरोनामुळं मृत्यु झाला आहे. नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगण्याचे सर्वच स्तरातून वारंवार प्रतिपादन केले जात आहे