COVID-19Nagpur Local
कोरोना मुक्त झालेल्या सात रूग्णांना मेयो मधून सुटी
आतापर्यंत 84 कोरोनामुक्त मेयोतील 47 रुग्णनाचा समावेश नागपूर दि 10 कोरोना विषाणूपासून मुक्त झालेल्या सात रुग्णनाना इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णनालय येथून सुटी देण्यात आली, त्याची दोन वेळा चाचणी घेण्यात आली असता निगेटिव्ह आल्यामुळे कोरोना मुक्त झाले आहेत, कोरोनाच्या संसर्ग झाल्यानंत दिनांक 19 मे रोजी मेयो मध्ये भरती करण्यात आले होते, आज सकाळी तीन तर सायंकाळी चार रूग्णांना सुटी देण्यात आली आहे, यामध्ये 29 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय पुरुष व 55 वर्षीय पुरुषांसाचा समावेश होता, सायंकाळी चार रुग्णनाना सुटी देण्यात आली यामध्ये 35 वर्षीय महिला, 38 वर्षीय महिला, 65 वर्षीय पुरुष, व 30 वर्षीय पुरूष याचा समावेश होता. डॉ सागर पांडे यांनी सातही रूग्णांना संपूर्ण तपासणी केल्यानंतर प्रशासनाने सुटी दिल्याची माहिती दिली.