कोरोना कहर: 6 दिवसांत 144 नवे रुग्ण, 600 त्याला बाधितांचा आकडा
नागपुर:- कोरोना रुग्ण संख्येतील सतत वाढीने प्रशासनसह डॉक्टरांचीही काळजी कमालीची वाढवलेली आहे दररोज वाढत असलेल्या रुग्णसंख्येने कॉरंटाईन केंद्रांवर संशयीतांची संख्याही वाढती आहे, स्थिती अशी आहे की सर्वच कॉरंटाईन केंद्र भरले आहेत आणि पुढील काही दिवस हा क्रम असाच चालू राहील असा अंदाज आहे.
यादरम्यान बुधवारी कोरोना चे 19 नवीन रुग्ण बाधित असल्याची खात्री झाली यासह शहरातील आकडा 602 पर्यंत पोहोचला मागील सहा दिवसात सर्वाधिक 144 रुग्ण वाढले आहेत.
प्रशासन जरी दावा करत असले की जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप नियंत्रणात आहे तरी दिवसेंदिवस वाढत असलेली रुग्णसंख्या पाहता आधीच्या तुलनेत रुग्ण वेगाने वाढत आहेत, मे महिन्यात रुग्ण संख्या कमी होती मात्र शेवटच्या आठवड्यात तर बुधवारपर्यंत रुग्ण सतत वाढले. हेच कारण आहे कि सहा दिवसात 144 रुग्न झाले, त्याआधी इतकेच रुग्ण व्हायला 20 दिवस अवधब घेतला गेला होता, म्हणजेच या अंदाजाने भविष्यात संक्रमणाची गती वाढती असेल असा अंदाज येतोय.
मोमिनपु-यात पुन्हा 6 नवीन, आतापर्यंत 217: यादरम्यान बुधवारी 19 नव्या रुग्णांचा अहवाल पॉझिटिव आला, सर्वांना वेगवेगळ्या ठिकाणचे कॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवले गेलेय, सर्व लोक कुठल्या ना कुठल्या प्रकारे पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेलेच आहेत, मात्र बहुतांश लोकांत अद्यापही लक्षणं दिसत नाहीत, यात मोमिनपु-याचे 6, नाईक तलाव बांगलादेश 6, नरखेड 3, व 1 जबलपूर रहिवासी बाधित असल्याची खात्री झालीय याशिवाय हंसापुरी येथील एका नागरिकाचा अहवालही खाजगी लॅबरोटरीत पॉझिटिव्ह आढळलाय तर एक रुग्ण गोळीबार चौक येथील आहे.
आतापर्यंत 50 वस्तींत प्रसार: कोरोनाने शहरातील तब्बल 50 वस्तींस बाधित केलेय, यासह दररोज नवनवीन परिसरात याचा प्रसार होत आहे. पॉझिटिव लोकांत लक्षणं दिसत नसल्याने त्यांचे संपर्कात येणारे सहजतेने या व्हायरसने ग्रस्त होत आहेत, दरम्यान बुधवारी 5 लोकांना सुट्टी दिल्या गेली, यात मेडिकल मधून 4 तर मेयोमधून 1 रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने नंतर सुट्टी दिली, पाचही लोकांस पुढचे काही दिवस होम कॉरंटाईन राहण्याचा सल्ला दिला गेला आहे.
अाजवरची स्थिति;
602 एकुण संक्रमित
19 बुधवारचे पॉजिटिव
11 आजवर मृत
1,520 एकुण संशयीत
344 होम क्वारंटाइन
423 लोकांस सुटी