कोरोना संसर्ग: 5 दिवसात 4603 रूग्णांस डिस्चार्ज, रिकव्हरी दर पुन्हा वाढतोय
नागपूर:- कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना, मृत्यूंसंख्येमध्येही वाढ काळजी वाढवत आहे. परंतु यासह, गेल्या आठवड्यात जिल्ह्यात रिकवरीचे प्रमाणही वाढले आहे ही चांगली गोष्ट समोर येते आहे. गेल्या 5 दिवसांत रुग्णालयात दाखल झालेल्या 6403 रुग्णांना बरे झाल्यानंतर सुट्टी देण्यात आलीय.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 2,13,926 जणांची कोरोना वैद्यक तपासणी करण्यात आली आहे. सोमवारी एकूण 3660 लोकांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी 715 लोक संसर्गित असल्याचे आढळले. यामध्ये 2041 पैकी निम्म्याहून अधिक लोकांची जलद चाचणी (रॅपीड टेस्ट) घेण्यात आली. ज्यामध्ये 363 अहवाल पॉझिटिव आले आहेत. सोमवारी 30 रुग्णांच्या निधनानंतर एकूण रुग्णांची संख्या 762 वर पोहोचली आहे.
कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अधिकाधिक लोकांची चाचणी हे याचे एक कारण आहे. जिल्ह्यात जलदगती चाचणी सुरू झाल्यापासून येत्या काही दिवसांत रुग्णांची संख्या वाढेल, असा निष्कर्ष काढला जातोय. गेल्या 5 दिवसांत जिल्ह्यात एकूण 16028 जणांची जलद चाचणी घेण्यात आली आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात 3363 होम आयसोलेशन असलेले ठिक झालेयत, रिकवरी प्रमाण वाढत आहे. सोमवारी 979 रुग्णांना बरे झाल्यानंतर सुट्टी देण्यात आली. याचप्रकारे कोविड सेंटरमधून व रूग्णालयांसह एकूण 12032 रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. त्याच वेळी, घरातच विलगीकरणामधून बरे होणा-यांची संख्या वाढून 3363 झाली. त्यानुसार जिल्ह्यात रिकवरीचा दर 56.88 टक्के असा झाला आहे.
हा दर दररोज वाढत आहे, ही चांगली गोष्ट आहे. सोमवारी 715 नवीन पॉझिटिव्हची भर पडल्याने जिल्ह्यातील रूग्णांची एकूण आकडेवारी आतापर्यंत 21154 वर पोचली आहे. ग्रामीण भागातील रूग्णांची वाढती संख्या अजूनही प्रशासनासाठी चिंतेचा विषय आहे. तज्ञांच्या मते, पुढील काही दिवसांत पाऊस कमी झाल्याने रुग्णांची संख्याही कमी होऊ शकते.
आतापर्यंत शहराची स्थिती
- 21154 एकूण संक्रमित.
- 762 मृत्यू
- सोमवारी 715 पॉजिटिव्ह
- बरे होऊन सुट्टी झालेले 12032
- 8360 सक्रिय प्रकरणं