कोरोना संसर्ग: आरपीएसएफ जवान पॉझिटिव, नागपूरात एकूण 455 संक्रमित
नागपूर:- संक्रमितांपासून संसर्गीतांचा आकड़ा वाढतो आहे. दररोज नवनवे रूग्न वाढताहेत, दिलासा हा की रूग्न बरे होऊन परतताहेत, मात्र संशयीतांची संख्या बरीच जास्त आहे तपासनी व ईतर प्रक्रियेत दिर्घकाळ जाईल. दरम्यान गुरुवारी 9 नवे रूग्न संक्रमिताची खात्री झाली, आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 455 झाली आहे.
गुरुवारच्या मिळालेल्या अहवालानुसार सिरसपेठ आणि बँक कॉलोनी भगवान नगरात 1-1 रूग्न, तसेच टिपू सुल्तान चौकात 2, मोमीनपुराचे 4 लोकांची रिपोर्ट पॉझिटिव आली. सर्वांस सुरक्षीततेस्तव क्वारंटाइन केले गेले. या दरम्यान अजनी रेल्वे क्वाटर्स येथील 45 वर्षाचा एक रेल्वे सुरक्षा विशेष बल (आरपीएसएफ) चा जवान देखील पॉजिटिव आढळला.
गेल्या काही दिवसांपासून श्रमिक स्पेशल ट्रेनसाठी बंदोबस्तावर होता. मुंबई ते दौंड अशी ड्युटी केल्यापश्चात काही दिवसांपूर्वीच प्रकृति अस्वास्थ्यामुळे त्याची तपासणी केली गेली. अहवालात कोरोना संसर्गाची खात्री झाली, ड्युटी दरम्यान अनेक लोकांशी त्यांचा संपर्क आला अशा सर्वांची ओळख पटवने कठिन आहे. अशा परिस्थितीत प्रशासनासही पेच पडल्याची अवस्था आहे.
लोक पुन्हा दहशतीत:
आता मनपा प्रशासन जवानाचे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांची ओळख काढत सर्वांना आयसोलेशन करण्याचे प्रयत्नात आहे. भगवाननगर निवासी, वय 59 घटना देखील हावरापेठ पॉझिटिव रूग्नाच्या संपर्कात आल्यानेच घडली आहे. आतापर्यंत अजनी रेल्वे क्वार्टर्स आणि बँक कॉलोनीत कोणताच रूग्न आढळला नाही. पण गुरुवारच्या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण आहे. आधीच पार्वतीनगरात पॉझिटिव आढळल्याने परिसर सील केला गेलाय. आता भगवाननगरचाही काही भाग सील केला जाईल. म्हणजेच शहरातील नागरिकांना काही दिवस तरी दिलासा नाही.
इतर जवानांची देखील तपासणी:
मध्य रेल्वेचे आरपीएफ कमांडेंट यांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वे विभागातर्फे विशेष रेल्वे व्यवस्थेत आरपीएफचीच विशेष तुकडी आरपीएसएफ जवानांस ट्रेनमध्ये एस्कॉर्टिंगसाठी तैनात राखले जातेय. आरपीएसएफ चे मध्यवर्ती कार्यालय मुंबईत आहे. मुख्यालयाचे आदेशावर आरपीएसएफच्या जवळपास 10 जवानांस दौंड वरून एस्कॉर्टिंग ड्युटीसाठी तैनात केले गेले. यातील 2 जवान मे च्या सुरूवातीस नागपूरात आले.
पॉजिटिव जवानास मेयोत दाखल केले आहे, तर त्याच काळात भरती इतर एका जवानाचा अहवाल निगेटिव असल्याने 7 दिवसांसाठी होम क्वारंटिन केले गेले. आरपीएसएफ चे जवळपास 8 जवान अमरावती-बडनेरामध्ये आहेत. काही नागपूरात येतील. त्यांचीही कोविड तपासणी केली जाईल, तर उर्वरीतांची अमरावतीत तपासणी होईल.
शहरात आजची स्थिती
- एकूण संक्रमित 455
- गुरुवारचे पॉझिटिव 9
- आतापर्यंत मृत 9
- एकूण संशयीत 1,796
- होम क्वारंटाइन 302
- बरे होऊन परतले 367