कोरोना तपासनी: खासगी लॅबोरेटरींसाठी सरकारने निश्चित केला दर
महाराष्ट्राचे आरोग्यमंत्र्यांनी शनिवारी स्पष्ट केले की सरकारने खासगी प्रयोगशाळांत केल्या जाणा-या कोरोना विषाणू चाचणीचे दर 4500 रुपयांवरून कमी करून 2200 रुपये केले आहेत. या चाचणीचे दर कमी केल्याने आता लोकांना थोडा दिलासा मिळेल.
ते म्हणाले, ‘व्हायरल ट्रान्सपोर्ट मीडिया (व्हीटीएम) च्या माध्यमातून स्वॅब गोळा करण्यासाठी रुग्णालयांना आता 2200 रुपये आकारण्यात येणार आहे, तर थेट घरून स्वॅबचे नमुने गोळा करण्यासाठी 2800 रुपये मोजावे लागतील. पूर्वी ही फी अनुक्रमे 4500 आणि 5200 रुपये होती.
आरोग्यमंत्र्यांनूसार सुधारित दर प्रयोगशाळांकडून आकारले जाणारे कमाल दर असतिल. हे दर आणखी कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी खासगी प्रयोगशाळांशी बोलू शकतात. “खासगी प्रयोगशाळांनी याहून जास्त शुल्क आकारल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल,” हे नवीन दर देशात सर्वात कमी असल्याचाही त्यांनी दावा केला.
कोविड -19 च्या चाचणीसाठी राज्यात सध्या 91 प्रयोगशाळा असून जवळपास चार ते पाच लवकरच तयार होतील. सरकारने मागील आठवड्यात राज्यातील अधिकृत खासगी प्रयोगशाळांद्वारे घेतल्या जाणार्या कोविड -19 चाचण्यांचे दर निश्चितीसाठी चार सदस्यीय समिती गठीत केली होती.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) राज्यातील 44 सरकारी आणि 36 खासगी प्रयोगशाळांना कोरोना विषाणूची तपासणी करण्यास परवानगी दिली आहे. सरकारी-प्रयोगशाळांत चाचण्या मोफत असतात. तर आयसीएमआरने खासगी प्रयोगशाळांमध्ये चाचणीसाठी 4500 रुपये शुल्क निश्चित केले होते.
पूर्वी चाचणीसाठी आवश्यक असे किट आयात केले जात होते. त्यामुळे आयसीएमआरने खासगी प्रयोगशाळांसाठी हे शुल्क निश्चित केले होते. मात्र, आता किट भारतातच तयार केल्या जात आहेत, करिता आयसीएमआर खासगी प्रयोगशाळांशी नवीन दर विचारणा करत त्याबाबत निर्णय घेऊ शकले.