कोरोना: तरूणाईत निष्काळजीपणा, भटकंती मौजमजेत रममाण
नागपूर:- कोरोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस वेगाने वाढतेय, तर शहरातील लोकांतून त्याची भीती पूर्णपणे गडप झाली असल्याचे चित्र आहे. जिथे तिथे गटागटांत लोक दिसताहेत. गर्दीच्या ठिकाणीही लोक निर्भयपणे जात आहेत आणि सामाजिक अंतर भान पूर्णपणे विसरलेयत. जणू या प्राणघातक साथीचा धाकच उरला नाही. विशेषत: तरुणाई मौजमजेत वावरतांना दिसत आहे. बाईकवर ट्रिपल सीट मोठ्या संख्येने दिसतात.
लॉकडाउन शिथिल होताच तरूणांत जशी पिकनिकचीच मनःस्थितीत आहे. बर्डिसारख्या बाजारपेठांत लोक फुटपाथ विक्रेत्यांकडून वस्तू खरेदी करण्यासाठी तुटून पडताहेत. शहरात कोरोनाचे सतत वाढते रूग्णप्रमाण आहे. डॉक्टरांनूसार जुलै ते नोव्हेंबर या काळात एक पीक टाईम असेल आणि त्यानंतर कोरोनाचा प्रभाव हळूहळू कमी होऊ शकेल. अशा वेळी, अधिक सावधगिरी बाळगणे आणि दक्षता घेण्याची गरज आहे परंतु शहरातील लोकांचे सद्य वर्तनातून निष्काळजीच प्रकट होत आहे.
शहरातील अंबाझरी तलावामध्ये मासेमारी करणा-यांचा व तरूणांचा समूह जमा होत आहे. ते अगदी एकमेकांच्या जवळ बसून मासे धरत आहेत. स्त्रियांचीही उपस्थिती इथे दिसते. बरेच मास्क न घातलेले आढळतात आणि सोशल डिस्टंसींग पार पळाले आहे. ही गर्दी येथून पळवून लावेल अशी अंबाझरी तलाव परिसरात कुठलिही सुरक्षा व्यवस्था नाही.
सुमारे दोन ते अडीच महिने घरात कैदेत राहिलेल्या लव्हबर्ड्सना तर अचानकचा अनलॉक वरदान ठरला आहे. अंबाझरी, फुटाळा, सेमिनरी हिल्स आणि सिव्हिल लाईन्सच्या काही निर्जन रस्त्यांवर जोडपी बिनधास्त आहेत.
रविवारी सिव्हिल लाईन्समध्ये रामगिरी रोडवर जेथे मुख्यमंत्री निवासस्थान, पोलिस जिम खाना, डीजी ऑफिस आणि न्यायाधीशांचे बंगले आहेत त्या रस्त्यांवर तरुणाईचाच कब्जा होता. अनेक जागी फोटो सेशन, सेल्फी सेशन, संभाषणात तासंतास रस्त्याच्या कडेला थांबलेले घोळके दिसत होते. काहींच्या दुचाक्या रस्त्याच्या मधोमध, बहुतेकांनी मास्क न लावलेले, छायाचित्रणात व्यस्त असे चालू होते. या ठिकाणी पोलिस अधिकारी आणि कर्मचा-यांचे आवागमन असते त्यांना तेथून हटवण्याचा प्रयत्न कोणीही केला नाही. शहरातील कोरोना संसर्ग पसरविण्यासाठी अशी गर्दी स्फोटक ठरू शकते.
शहरातील बाजारपेठांत भाजीपाला वगैरे खरेदीसाठी लोक गर्दी करत आहेत, सीताबर्डीत तर रविवारी लोकांची फार मोठी गर्दी आढळली. फुटपाथवर कपडे, शूज, चप्पल, रेनकोट, सौंदर्यप्रसाधने इत्यादी विकणार्या विक्रेत्यांसमोर लोक गर्दी करून होते. येथेही बहुतेक विक्रेत्यांनी मास्क वा हातमोजे घातलेले दिसत नव्हते.