कोरोना वॉरियर्स पोलिसांनाच नाहीत शहरात बेड उपलब्ध: आयुक्त अमितेश कुमार यांची नाराजी
नागपूर: कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतो आहे व कोरोना रुग्ण संबंधित बातम्या व अफवांचं पेव शहरभरात पसरत आहे, अशात परवा नागपुरात खुद्द पोलिसांसाठीच बेड उपलब्ध नसल्याची वार्ता शहराचे नवे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे कानावर गेली, यासंदर्भात त्यांनी तातडीची कारवाई करत सदर बाधित पोलिस कर्मचा-यांना रूग्णालयात बेड उपलब्ध होईल यासंबंधी यंत्रणेस खडसावून जागे केले.
कोरोना बधित पोलीस कर्मचाऱ्यांना रुग्णालयात बेड का उपलब्ध होत नाहीत? त्याविषयक यंत्रणेतील झोनल अधिका-यांची कान उघडणी नवे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना करावी लागली आहे. कोरोना वरियर्स म्हणून महत्वाची कामगिरी बजावणारे पोलिसांनाच जर अशी वागणूक मिळत असेल तर हा प्रकार अत्यंत वाईट आहे असे त्यांनी म्हटले आहे.
यासंबंधित त्यांची संभाषणाची एक ऑडिओ क्लिपच सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालेली आहे, यात त्यांनी अधिकाऱ्यांस याबाबत विचारणा केली असल्याचे आढळते.
बाधित कर्मचाऱ्यांची माहिती सांगत त्यांना सायंकाळपर्यंत बेड उपलब्ध झाले नाही तर ते स्वतः जातीने मनपा आयुक्तांकडे जाऊन याबाबतची तक्रार करणार असल्याची त्यांनी सांगितले
अशाप्रकारे कोरोना लढ्यात अग्रभागी लढा देणाऱ्या व्यक्तींनाच जर बेड मिळत नाही हे चित्र दुर्दैवी आहे, कुटुंब फक्त आपल्यालाच आहे काय त्यांना कुटुंब नाहीत काय? अशी विचारणाही त्यांनी केली. अशा लोकांना प्राथमिकतेने बेड मिळणे ही भविष्यासाठीचीही तजवीज असावी असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. शिवाय दाखल करतांना रूग्णालयाचे फी म्हणजे संबंधित ची रक्कम भरण्याची प्रक्रिया ही पोलिस विभागाची असेल अशी त्यांनी खात्री दिली.
एका चमूचे नेतृत्व करत असताना टिमलिडर कसा असावा याचं उदाहरणच आयुक्त अमितेश कुमार यांनी दाखवून दिले आहे.