महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेनेतर्फे कोरोना योद्धे सत्कारीत
नागपुर:- कोरोना रोगाने संपुर्ण देशात थैमान घातलेले असताना ह्या संकट प्रसंगी देशासाठी व जनतेसाठी आपले कर्तृत्व जोमाने बजावणाऱ्या व पांचपावली विलगीकरण केंद्राचा उत्तम रीतीने भार उचलणाऱ्या पांचपावली पोलीस स्टेशनाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री किशोर नगराळे व आसीनगर झोन चे सहायक आयुक्त श्री गणेश राठोड साहेब ज्यांनी आपल्या झोन अंतर्गत असलेल्या परिसराची धुरा चांगल्या रीतीने सांभाळली असल्यामुळे या दोन्ही कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी व मनवीसे नागपुर जिल्हाध्यक्ष दिनेश ईलमे ह्यांचे प्रमुख उपस्थितीत सन्मान चिन्ह व तुळशी रोप देऊन सत्कारीत करण्यात आले.
दोन्ही जनसेवक अधिकाऱ्यांनी या सत्कारादाखल आभार व्यक्त करतांना आपल्या भावना मोकळ्या केल्या, सत्कार हुरूप वाढवणारा व सहका-यांत विश्वास, अभिमान वाढवणारा आहे तसेच ह्यामुळे भविष्यात काम करण्याकरीता आमच्या आत्मविश्वासात आणखी वृद्धी होईल असे सांगितले
याप्रसंगी शहर सचिव श्याम पुनियनी, उत्तर विभाग अध्यक्ष उमेश बोरकर, (उत्तर विभाग अध्यक्ष मनवीसे मनोज काहलकर, सुमित जांभुळकर आदींची उपस्थिती होती.