Breaking NewsCOVID-19Nagpur Local

कोव्हिड संदर्भातील परिस्थितीचा घेतला आढावा, रविवारपासून ‘वॉकर स्ट्रीट’वर ऑक्सिजन तपासणी

 कोव्हिड संदर्भात परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी (ता.५) महापौर संदीप जोशी यांनी वानाडोंगरी येथील शालिनीताई मेघे आणि डिगडोह येथील लता मंगेशकर रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयासंदर्भातील नागरिकांच्या तक्रारी व रुग्णालय प्रशासनाला येणाऱ्या अडचणी याबाबत चर्चा केली. यावेळी मनपाचे आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, शालिनीताई मेघे रुग्णालय व अनुसंधान केंद्राचे अधिष्ठाता डॉ.दिलीप घोडे, डॉ. सौरव, डॉ. सिंग, डॉ. खान, डॉ.ललित जाधव, लता मंगेशकर रुग्णालयाचे प्रशासकीय संचालक कर्नल धानोरकर, वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी मेजर लोकेश उपस्थित होते.
जास्त लक्षणे असलेल्या कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज असते. अनेकदा रुग्णालयात गेल्यानंतर व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याने रुणांना परत पाठविण्याचा प्रकार घडतो. कोरोनाच्या संकटात रुग्णांची ही भटकंती टाळण्यासाठी रुग्णात जास्त लक्षणे आढळल्यास त्याची सविस्तर माहिती त्वरित मनपाच्या नियंत्रण कक्षाला द्यावी. आवश्यक माहिती घेतल्यानंतर नियंत्रण कक्षाकडून बेडची उपलब्धता लक्षात घेऊन संबंधित रुग्णालयात भरती होण्याचे सुचविले जाते. मात्र प्रत्यक्ष रुग्णालयात गेल्यानंतर आधी रुग्णाची ऑक्सिजनची पातळी तपासली जाते. ती पातळी कमी असल्यास रुग्णाला परत पाठविले जाते. शालिनीताई मेघे आणि लता मंगेशकर रुग्णालय शहरापासून दूर असून शहरातून येथे जाणाऱ्या रुग्णांना सर्वाधिक त्रास होतो. रुग्णालयात जाण्यापूर्वी ऑक्सिमीटरवरून रुग्णाची ऑक्सिजन पातळी तपासावी ती जर ९५ पेक्षा कमी असल्यास शहराबाहेरील वानाडोंगरी येथील शालिनीताई मेघे किंवा डिगडोह येथील लता मंगेशकर या सारख्या रुग्णालयामध्ये रुग्णास दाखल करणे गैरसोईचे होईल त्यामुळे शक्यतो अशा रुग्णास जवळच्या रुग्णालयात दाखल करावे, अशी सूचना महापौर संदीप जोशी यांनी केली.
शालिनीताई मेघे रुग्णालयाच्या वतीने उद्या रविवार (ता.५) पासून ‘रामगिरी’ या मुख्यमंत्री निवासस्थानापुढील ‘वॉकर स्ट्रीट’वर ऑक्सिजन तपासणी केली जाणार आहे. कोरोनामध्ये एकदम ऑक्सिजनची पातळी कमी होणे हे अत्यंत धोकादायक आहे. अशा स्थितीत सर्वच नागरिकांनी घरात ऑक्सिमीटर ठेवावा. ९५ ते १०० दरम्यान ऑक्सिजन असणे आवश्यक आहे. नागपूरकरांना ही सवय लावण्यासाठी ‘वॉकर स्ट्रीट’वर सहा मिनिटे पायी चालल्यानंतर ऑक्सिमीटरद्वारे तपासणी केली जाईल. सहा मिनिटे चालल्यानंतर ९५ ते १०० च्या दरम्यान ऑक्सिजनची पातळी असल्यास सदर व्यक्ती सुदृढ समजली जाईल. अन्य नागरिकांचे वैद्यकीय समुपदेशन केले जाईल, असे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप घोडे यांनी सांगितले.
लता मंगेशकर रुग्णालयात झालेल्या चर्चेमध्ये रुग्णालयाचे प्रशासकीय संचालक कर्नल धानोरकर यांनी या समस्येवर सहकार्य करण्यास तयार असल्याचे सांगितले. यासाठी रुग्णांना  रुग्णालयाचे निर्धारित शुल्क भरावे लागणार आहे. लता मंगेशकर रुग्णालयात कोव्हिडचे एकूण १९० बेड असून त्यात १० आयसीयू चे तर १० व्हेंटिलेटरचे आहेत. यामध्ये आणखी बेड वाढविण्यात येणार असल्याचे कर्नल धानोरकर यांनी सांगितले. आयसीयूचे बेड वाढविण्यासाठी आवश्यक उपकरणांची पूर्तता करण्याची मागणीही त्यांनी यावेळी महापौरांकडे केली. यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन महापौर संदीप जोशी यांनी दिले.

Team Nagpur Updates

Nagpur Updates is your local/Digital news, entertainment, Events, foodies & tech website. We provide you with the happening news, Page3 Contain and all about Nagpur Foodies & Infrastructure from the Nagpur and world.

Related Articles

Back to top button

Adblock Detected

Disable Your Add Block To View Page.