कोरोना चाचण्या घटल्याने पॉजिटिव्ह संख्या कमी
नागपूर:- महिन्याच्या सुरूवातीस, जेव्हा दररोज चाचणी 8000 पेक्षा जास्त होण्यास प्रारंभ झाली, तेव्हा संक्रमित लोकांची संख्या देखील वाढू लागली. परिस्थिती अशी होती की एका दिवसात 2000 हून अधिक संक्रमितांची ओळख पटली जात होती. जे गंभीर होते त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तर लक्षणे नसलेल्यांना गृह विलगीकरणाची सुविधा देण्यात आली होती. परंतु गेल्या आठवड्यापासून पॉजिटिव्ह रूग्णांची संख्या कमी होत आहे. याचे कारण संक्रमण नियंत्रित झाले नसून चाचण्या कमी होणे होय. शहरातील मनपा आणि जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ढिसाळपणाचा परिणाम अधिकाधिक लोकांची तपासणी होत नसल्याचे दिसून येत आहे.
तो व डॉक्टरां नूसार, ऑक्टोबरमध्ये देखील कोरोना विषाणूचा प्रसार वेगात होईल. याचे मुख्य कारण म्हणजे हवामानातील बदल. थंड हवामान सुरू झाल्यावर, सर्दी, खोकला यासारख्या संसर्गजन्य आजार सामान्य होतील. ज्याने पुन्हा एकदा कोरोना फैलण्याची शक्यता बळावत आहे. यामुळेच सध्या दररोज जिल्ह्यातील अधिकाधिक लोकांची तपासणी होणे आवश्यक आहे. जेणेकरून संक्रमित व्यक्तीची ओळख पटवून वेळेवर उपचार करता येईल. याद्वारे मृत्यूचे प्रमाणही कमी होऊ शकते. पण सध्या परिस्थिती उलट आहे. दिवसेंदिवस चाचण्या कमी होत आहे.
लोक तपासणी करत नाहीत: मनपा आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे याबद्दल वेगवेगळे युक्तिवाद आहेत. अधिका-यांचे म्हणणे आहे की लोक चाचणी करायला पुढे येत नाहीत. खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये रूग्णांची गर्दी पाहता असे दिसते की संसर्ग कमी झालेला नाही. याचा अर्थ असा की लोक एकतर तपास करण्यास टाळाटाळ करतात किंवा यंत्रणा सुस्त झाली आहे. आगामी थंड हवामान पाहता ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरू शकते. नुकतीच आरोग्यमंत्र्यांनी अधिकाधिक लोकांची चाचणी व्हावी अशा सूचना दिल्या होत्या. परंतु त्याऐवजी तपासाचा वेग कमीत होऊ लागला आहे.
34 लोकांचा मृत्यु: सोमवारी जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत एकूण 4193 लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 1516 लोकांची एन्टीजेन चाचणी घेण्यात आली. तर एकूण पॉजिटिव्ह 994 आढळले. अशाप्रकारे जिल्ह्यात आतापर्यंत संक्रमित रूग्णांची संख्या 75815 वर पोहोचली आहे. त्याचवेळी 38 रुग्णांचा मृत्यू झाला. यापैकी 14 रुग्ण हे जिल्ह्याबाहेरील आहेत. म्हणजेच जिल्ह्यात एकूण 34 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 2438 लोकांचा बळी गेला आहे. सध्या जिल्ह्यात 13680 सक्रिय प्रकरणे आहेत. जे दोन आठवड्यांतले कमाल आहे. सोमवारी, 1431 रुग्णांना बरे झाल्यानंतर सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत 59697 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 437845 लोकांची चाचणी घेण्यात आली आहे.
माफसूच्या प्रयोगशाळेत चाचण्या नाही: माफसूच्या प्रयोगशाळेत सोमवारी कोणत्याही नमुन्याची चाचणी होऊ शकली नाही. कोणतेही अधिकारी याबाबतचे कारण स्पष्ट करू शकले नाहीत. अलीकडेच मेयोमधील तपासणीही कमी करण्यात आली. याचे कारण डॉक्टरांसह तंत्रज्ञांना संसर्ग झाल्याचे सांगण्यात आले.