शहरातील सर्व सिनेमागृह चालू करण्याची व्यवस्थापक व संचालकांची मागणी
नागपूर:- कोरोना प्रसार रोखथामासाठी लादलेला लॉकडाऊन दोनच महिन्यात अनलॉकमध्ये बदलला गेला बरेच उद्योगधंदे व सार्वजनिक स्थळांना मोकळीकही दिली गेलीय परंतु सिनेमागृह अद्याप बंद आहेत, सर्व सिनेमागृह चालकांची, कर्मचा-यांची दैनावस्था तब्बल सहा महिने उलटूनही अद्याप संपलेली नाही. यामुळे शहरातील सिनेमागृह संचालकांनी सिनेमागृह उघडण्यास प्रशासनाने परवानगी द्यावी हि मागणी लावून धरली आहे.
सर्वच सार्वजनिक उपक्रम जवळपास मोकळे केले गेलेले आहेत. प्रवास व परिवहन व्यवस्थाही सोशल डिस्टेंसींग पाळत सुरू आहे, अशात सिनेमागृहांतच गर्दि होईल हा समज दूर सारणे गरजेचे आहे, गर्दिस आवर घालण्यास सोशल डिस्टेंस काटेकोरपणे थेटरलाच शक्य आहे, प्रत्येक सिनेमागृहांना प्रशस्त आवार आहेत, दोन ते तीन खुर्च्यांआड प्रेक्षक बसवण्याची सोय येथे शक्य आहे.
दारातच येणा-याचे सॅनिटाईजेशन सहज आहे, मधल्या काळात हॉल सॅनिटाईजेशन तत्व राबविले जाईल, पार्किंग प्रशस्त आहे, ऑनलाईन तिकीट बुकिंगने सुरूवातीची गर्दीही होणार नाही. ईत्यादी सर्व उपाय योजना करण्यास तयार सज्ज असुनही थेटरच्या सुरू होण्याबाबत प्रशासन दुर्लक्ष करित आहे.
सिनेमागृहावर अवलंबित असणारे चालक, कर्मचारी रोजगाराच्या संधीस मुकत आहेत, त्यांचे परिवाराची आबाळ होत आहे, या बाबीकडेही व्यवस्थापकांचे शिष्टमंडळाने लक्ष वेधून दिले. व लवकरात लवकर शहरातील सर्व सिनेमागृह चालू करावी अशी यावेळी विनंती केली.