घाबरू नका, सतर्कतेनेच पळेल कोरोना व्हायरस: रूग्णसंख्या आणखी वाढेल, स्वत:चा करावा बचाव
नागपूर:- शहरात कोरोना रूग्णांची संख्या सतत वाढतेय. पहाता पहाता आकडा 500 पल्याड गेला. जून आणि जुलैमध्ये हा ग्राफ असाच वेगवान राहील. तरी बर्याच लोकांत लक्षणं दिसत नाहीय, ती सामान्य रूग्णाप्रमाणे असल्याने व्हायरसविरोधात लढ्यात मदत होतेय, रिकवरी रेट अधिक असल्याचे देखील हेच कारण आहे. म्हणून कोरोनापासून घाबरण्याची आवश्यकता नाही, परंतु सतर्कता बाळगण्याची गरज आहे.
कोरोना संक्रमितांच्या वाढत्या आकड्यांमुळे लोकांत भितीची स्थिति आहे. दररोज नवनव्या जागांतून रूग्ण सापडताहेत, त्यांचे संपर्कातील असलेल्यांची साखळी वाढती आहे. आणि ही स्थिति पुढील काही महिन्यांपर्यंत अशीच चालू असणार आहे. पण या सर्वामुळे घाबरण्याची गरज नाही. आपल्या स्वत:च्या बचावाची आवश्यकता आहे.
एम्सच्या डायरेक्टर डॉ. विभा दत्ता मानतात की प्रारंभि लोकांनी लॉकडाउनचे काटेकोर पालन केले. पण जस-जसा वेळ जातोय, लोकांची सतर्कता काही अंशी कमी होऊ लागलीय, परिणामी रूग्णसंख्या वाढत आहे. तसे पाहिल्यास या संख्येत पुढील महिन्यांत आणखी वाढ संभवते, परंतु यात घाबरण्याची गरज नाही. रूग्णसंख्या कमी होईल, केव्हा ते आताच सांगता यायचे नाही. पण स्वत:चे बचावासाठीचे उपाय चालूच ठेवायाचे आहेत.
नियमांचे पालन जरूरी: डॉ. दत्ता मानतात वारंवार हात धुने, मास्क वापरने आणि सॅनिटायझरच्या उपयोगाने कोरोना विषाणु विरोधात लढा शक्य आहे. ही चांगली बातमी आहे की पॉझिटिव लोकांत त्याची लक्षणं दिसत नाहीत. परंतु बर्याच वेळा हेच लोक इतर लोकांस अडचणीचे ठरतात, कारण पॉझिटिव्ह असुन ते अनभिज्ञ असतात. शास. महाविद्यालय व हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अविनाश गावंडे मानतात की लोकांनी अजिबात घाबरू नये, कारण प्रशासकी स्तरावर सर्वच प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत फक्त लोकांनी सावधगीरी बाळगावी. सुरक्षितता न बाळगण्यामुळेच आज दिसते ती रूग्णसंख्या बळावलीय. बहुतेक रूग्णांत लक्षणं आढळत नाही याचाच अर्थ या लोकांची प्रतिकारक क्षमता चांगली आहे. व उपचार करणा-या डॉक्टरांसाठी देखील हे चांगले संकेत आहेत.
“कोरोना पासून घाबरून जाण्याऐवजी सतर्कता बाळगने जरूरीचे आहे. नियमांचे पालन करा, थोडीशी निष्काळजीही अंगलट येऊ शकते. लोकांचे जागरूकतेनेच विषाणुस दूर सारले जाऊ शकते.- डॉ. विभा दत्ता, संचालिका, एम्स संपर्कात येणा-यांमुळेच हा आजार वेगाने वाढतो आहे. मात्र जर सतर्कता बाळगल्यास कोरोना विषाणु जवळही फटकणार नाही. इम्युनिटी वाढवण्यास सकस आहार व व्यायामावर लक्ष देणे गरजेचे आहे.
~अविनाश गावंडे, वैद्यकीय अधिक्षक, मेडिकल