डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने ३ वर्षाची वितरण त्वरित करा. दलितमित्र संघाची मागणी
महाराष्ट्र शासनाने सन 1971 पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने दलित मित्र पुरस्कार सुरू केला. या पुरस्कारांच्या नावांमध्ये सन 2012 पासून बदल करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार असे नाव ठेवण्यात आले. हा पुरस्कार समाजामध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या ५० सामाजिक कार्यकर्त्यांना प्रत्येक वर्षी 14 एप्रिल ला, देण्यात येतो. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार दिला गेला नाही.
तसेच मागील दोन वर्षापासून या पुरस्काराचे वितरण करण्यात आले नाही. प्रत्येक वर्षी डिसेंबर महिन्यात राज्यातून याकरिता कार्यकर्त्यांकडून प्रस्ताव मागीतला जातो. व 50 पुरस्कर्त्यांची निवड करण्यात येते. अशा प्रकारे कार्यकर्त्यांना समाजभूषण पुरस्काराने दिनांक 14 एप्रिल 2021 रोजी सन्मानित करणे म्हणजे फुले-शाहू-आंबेडकर यांच्या नावाने राज्याची धुरा सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री व सामाजिक न्यायमंत्री यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्त नागपूर डॉ. संजीव कुमार यांना निवेदन देण्यात आले. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित | मित्र संघाचे राज्य सरचिटणीस योगेश वागदे वकोषाध्यक्ष भूषण दडवे आणि शहराध्यक्ष रामगोविंद खोब्रागडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.