दुष्यंत चतुर्वेदी शिवसेनेचे महानगर प्रमुख: शिवसैनिकांत आनंदाची लाट
नागपूर:- राजकारणाच्या दृष्टीने आता शिवसेना उपराजधानी नागपूरला अधिक महत्त्व देत आहे. आता नागपुरातही सेनेने आपली ताकद वाढवायला सुरुवात केली आहे. यामुळेच प्रथमच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूर महानगरप्रमुख पदाची जबाबदारी आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांना दिली आहे. त्यांच्या नियुक्तीबाबत शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. आतापर्यंत शिवसेना जिल्हाध्यक्षांची नेमणूक करत होती त्याअंतर्गत दोन शहर प्रमुखांची नेमणूक करण्यात यायची.
आता शहर प्रमुखांऐवजी शिवसेनेने दुष्यंत यांना प्रथमच महानगराचे प्रमुख म्हणून नियुक्त केले आणि पक्ष संघटनेला घट्टपणे उपराजधानीत रोवण्याचे काम त्यांचेवर सोपवले. शिवसेनेच्या शहरप्रमुखांना मागे अटक झाल्यानंतर पक्षप्रमुखांनी जिल्हाध्यक्षांची पुन्हा नियुक्तीही तहकूब राखली होती. अशा परिस्थितीत आता दुष्यंत यांना देण्यात आलेली नवीन जबाबदारी महत्त्वाची मानली जातेय.
शुभेच्छांचा वर्षाव: दुष्यंत यांची नियुक्ती झाल्याचे समजताच शिवसैनिक व पदाधिका-यांमध्ये आनंदाची लाट आली. फटाके फोडून आणि मिठाई वाटून तरुणांनी त्यांचे स्वागत केले. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी सर्वच शिवसैनिक घरी पोचले. माजी जिल्हाप्रमुख सतीश हरडे, शहर समन्वयक नितीन तिवारी, युवा सेनेचे हितेश यादव, गुड्डू रहांगडाले, मुन्ना तिवारी, अक्षय मेश्राम, आशिष हाडगे, अब्बास अली, ओंकार पारवे, बाल्या मगरे, ललित बावनकर, शशिधर तिवारी, शशिकांत ठाकरे, आकाश पांडे, संदिप पटेल, पवन घुग्गुस्कर, बंटी धुर्वे, धीरज फंदी, छगन सोनवणे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
मनपात फडकवणार भगवा: नवनियुक्त महानगर प्रमुख दुष्यंत चतुर्वेदी म्हणाले की, पक्षप्रमुखांनी दिलेली जबाबदारी पूर्ण ताकदीने पार पाडण्याचा प्रयत्न करू. त्यांचे लक्ष्य संघटना मजबूत करणे हे आहे. ते म्हणाले की, येत्या मनपा निवडणुकीत महानगरपालिकेत शिवसेनेचाच भगवा ध्वज फडकविला जाईल.