जिल्हा परिषदेत आपत्कालीन विलगीकरण केंद्र
नागपूर:- सिव्हिल लाईन्समध्ये आता विभागीय आयुक्त कार्यालयाचे आवाराला लागून असलेल्या जिल्हा परिषद मुख्यालयातील कर्मचारी व अधिका-यांत दहशत आढळतेय. तथापि, लॉकडाउन झाल्यापासूनच मुख्य गेटवर सॅनिटायझरची व्यवस्था केली गेली होती आणि सरकारच्या सूचनेनुसार केवळ 5-10 टक्के कर्मचारी कार्यरत होते. परंतु आता ग्रामीण भागातील कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संख्येत वाढ झाल्याने मुख्यालयात दक्षता वाढविण्यात आली आहे, कारण ग्रामीण भागातील मिनी मंत्रालयाच्या जि.प. मुख्यालयात ग्रामीण भागातील नागरिक आपल्या कामांसाठी येत असतात.
अशा परिस्थितीत कोणती व्यक्ती कोरोना वाहक आहे, हे सांगता यायचे नाही. आताशा संक्रमित व्यक्तीचे शरीरात कोरोनाची लक्षणे देखील दिसत नाहीत, म्हणून जोखीम वाढली आहे. झेडपी मुख्यालयात कर्मचारी आणि अधिकारी याच पेचात आहेत आणि जर त्यांचेपैकी कोरोनाची चिन्हे दिसली तर त्वरित त्यांना अलग ठेवण्यासाठी जुन्या इमारतीतील मीटिंग हॉलमधे 3 बेडचे विलगीकरण केंद्रच तेथे तयार केले आहे. संशयितास तेथे आधी अलग ठेवण्यात येईल आणि त्यानंतर रुग्णवाहिका बोलवून रुग्णालयात पाठविण्यात येईल.
एक वगळता इतर सर्व प्रवेशद्वार बंद: जिल्हा परिषद कार्यालयात जाण्यासाठी 4-5 दरवाजे आहेत . काही दिवसांआधी, सर्व दारे खुली होती आणि इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ फक्त एक सॅनिटायझर होता. आता फक्त एक दरवाजा खुला ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर अभ्यागतांच्या थर्मल स्क्रिनिंगचीही व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय हॅन्डवॉश वॉशरूममध्ये ठेवल्याबद्दलचीही अधिका-यांनी माहिती दिली. सर्व कर्मचार्यांना सूचना देण्यात आल्या आहेत की जर कोणाला ताप, सर्दी, खोकला तसेच कोरोनाची लक्षणे जाणवत असतील तर त्यांचे ताबडतोब विलगीकरणास्तव अधिका-यांना कळवावे जेणेकरुन त्यांना उपचारासाठी पाठविले जाऊ शकते.
जिल्ह्यात 45 झाली संख्या: जोवर कामगार परतून गावी गेले नव्हते तोपर्यंत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण नव्हते. कामठीमध्ये केवळ 1 रुग्ण आढळला. परंतु बाहेरून येणार्या लोकांमुळे आतापर्यंत जिल्ह्यातील ग्रामीण भागात 45 रूग्ण सापडले आहेत. यातील बहुतेक लोक उपचारानंतर पूर्णपणे निरोगी झाले, पण आता ग्रामीण भागात भीतीचे वातावरण आहे. जिल्हा परिषदेत ग्रामीण भागातून लोक येतात. कोरोना लॉकडाऊन आणि भीतीमुळे फारच कमी नागरिक, जिप सदस्य येत आहेत, परंतु तरीही सोशल डिस्टंसींग कायम आहे याची खबरदारी घेतली जात आहे. मास्क वापरात आहे. सॅनिटायझेशन न करता प्रवेश दिला जात नाही.