Uncategorized

आकस्मिक शट डाऊन : चिंचभवन रेल्वे ट्रॅक जवळ ५०० मी मी व्यासाच्या जलवाहिनीला गळती ..

नागपूर, डिसेंबर २०, २०२२ : चिंचभवंन जलकुंभावरून येणारी ५०० मी मी व्यासाच्या जलवाहिनीवर आज दुपारी चिंचभवंन रेल्वे ट्रॅक जवळ , इंगोले नगर येथे फार मोठी गळती उदभवलेली आहे. हि गळती दुरुस्त करणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा नजीकच्या नागपूर-मुंबई रेल्वे ट्रॅक ला मोठा धोखा उद्भवण्याची शक्यता आहे . ह्या कामाकरिता नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी उद्या , दि २१.१२.२०२२ (बुधवारी) आकस्मिक शटडाउन घेऊन जलवाहिनी दुरुस्त करण्याचे ठरविले आहे.

ह्या कामामुळे चिंचभवन जलकुंभाचा पाणीपुरवठा अनिश्चित कालावधीसाठी बाधित राहण्याची शक्यता आहे .

चिंचभवन वरून पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग: सुरज सोसायटी , श्याम नगर , जय दुर्गा सोसायटी – ३, ४, ५, ६ , संताजी सोसायटी, न्यू लोककल्याण सोसायटी, साई प्रभा सोसायटी, शिल्पा सोसायटी, कन्नमवार नगर, , इंगोले नगर, सुरज सोसायटी, चिंचभवन , न्यू मनीष नगर, जय हिंद सोसायटी, महालक्ष्मी सोसायटी, राजगृह सोसायटी, गीतांजली सोसायटी, पायल-पल्लवी सोसायटी, कैकाडी नगर, ओम शांती सृह निर्माण सोसायटी, मेहेर बाबा सोसायटी, गिरिकुंज सोसायटी, कचोरे पाटील नगर ले आउट, चिखली ले आउट, जुनी वस्ती चिंचभवंन , उदय सोसायटी आणि वैशाली नगर व इतर नजीकचा परिसर

गळती दुरुस्ती कामानंतरच ह्या बाधित भागांना -त्या त्या भागातील वेळेनुसार (समयसारिणीनुसार) पाणीपुरवठा पूर्ववत होणार आहे, याची नागरिकांनी नोंद घ्यावी .
ह्या आकस्मिक शटडाऊन  कालावधी दरम्यान टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी ह्या भागातील सर्व नागरिकांना विनंती केली आहे कि त्यांनी ह्या कामादरम्यान सहकार्य करावे. 
इतर कुठल्याही माहितीकरिता मनपा -OCW मदत क्रमांक १८००२६६९८९९ वर संपर्क करावा 

Nagpur Updates

Nagpurupdates is your local/Digital news, entertainment, Events, foodies & tech website. We provide you with the happening news, Page3 Contain and all about Nagpur Foodies & Infrastructure from the Nagpur and world.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Disable Your Add Block To View Page.