मोमीनपुरा येथील अतिक्रमण निमूलन कारवाई
दिनांक 10/11/2021 व दि. 11/11/2021 रोजी सकाळी 11.00 वा. ते 18:00 वा. दरम्यान पोलीस स्टेशन तहसील नागपूर शहर हद्दीत मोमीनपुरा भागात अतिक्रमण निमुलन कारवाई करण्यात आली.
शहरातील प्रमुख बाजारपेठांपैकी एक असलेल्या मोमीनपुरा अवैध अतिक्रमणाची समस्या मोठी आहे. रस्त्यांवर तसेच फुटपाथवर दुकाने थाटल्यामुळे येथे सहज खरेदीसाठी पोहोचणा—या नागरिकांना अधिक अडचणीचा सामना करावा लागतो, अतिक्रमणामुळे दुकानासमोर दुचाकी लावण्या साठीही जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे या ठिकाणी रस्त्यावर नेहमी वाहतुक जाम असते हे विशेष.
त्यामुळे डोकेदुखी ठरलेली मोमीनपुरा येथील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी पोलिस विभागातील अधिकारी व अंमलदार तसेच नागपूर महानगर पालीकेचे महाल झोन चे उपायुक्त व त्यांचे अधिनस्थ अतिक्रमण निमूलन दस्ताचे अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर उतरले. बुधवारी व गुरूवारी करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान एकापाठोपाठ एक अतिक्रमण हटवण्यात आले. संपूर्ण ताफ्यासह शहरातील गजबजलेल्या मोमीनपुरा मुख्य रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त केला. भविष्यातही ही बाजारपेठ आणि येथील रस्ते अतिक्रमणमुक्त राहतील, अशी धडकेबाज कारवाई यादरम्यान करण्यांत आली. सदर कारवाई मधे एकुण 59 प्रतिष्ठाणचे अतिक्रमण काढण्यात आले. तसेच एकुण 4 ट्रक माल मनपा अतिक्रमण निमूलन पथकाने जप्त केला.
सदर कारवाई हि मा. पोलीस उपायुक्त श्री गजानन राजमाने, यांचे मार्गदर्शनात, पोलीस निरीक्षक पो.स्टे. तहसील श्री बबन येडगे सोबत 6 पोलीस अधिकारी 40 पोलीस अमलदार, आर.सी.बी. चे एक पथक तसेच नागपूर महानगर पालीकेचे उपायुक्त श्री अशोक पाटील, निरीक्षक श्री संजय कांबळे, श्री धर्मेय, श्री विशाल ढोणे यांनी केली.