Informative

21 दिवसांपासून वाघिनीचा शेतताबा: मानव-वन्यजीव संघर्ष थांबविण्यासाठी वनविभागाचा अलर्ट

नागपूर:- दक्षिण उमरेड वनक्षेत्राच्या मौजा बेसूर परिसरात उसाच्या शेतावर वाघाने गेल्या 21 दिवसांपासून ताबा घेतला आहे. मानवी-वन्यजीव संघर्ष परिस्थिती रोखण्यासाठी उमरेड वनविभाग आणि एसटीपीएफचे पथक दिवसाचे 24 तास पहारा देत आहेत. अलीकडेच वाघिनीने 2 शेतकर्‍यांवर हल्ला केला. या घटनेनंतर आसपासच्या ग्रामीण भागात भीतीचे वातावरण आहे. वाघिनीने ऊसाचे शेतीत 4 शावकांना जन्म दिलाय, बचावाचे संभवात वाघिनीने 23 मे रोजी दोन शेतक-यांवर हल्ला केला. जखमी केल्यानंतर वाघीण जवळच्या उसाच्या शेतात लपली. वेळेवर केल्या गेलेल्या उपचारामुळे दोन्ही शेतकर्‍यांची प्रकृती स्थिर आहे.

वनाधिका-यांनी केलेल्या तपासणीत असे दिसून आले की या वाघिनीने 4 शावकांना जन्म दिला असून ती ऊस शेतात आपल्या मुलांचे संरक्षण करीत आहे. मानवी-वन्यजीव संघर्षाची परिस्थिती रोखण्यासाठी आणि वाघ आणि शावकांना संरक्षण देण्यासाठी उमरेड वन अधिका-यांची टीम गेल्या 21 दिवसांपासून कार्यरत आहे. वास्तविक बेसूर वनक्षेत्र आरक्षित वनक्षेत्र आहे. उमरेड करांडला आणि ताडोबाला जोडणार्‍या या कॉरिडॉरमधून वन्यप्राणी प्रवास करतात. या वन कॉरिडॉरच्या सभोवताल काही गावे आहेत आणि लोक जंगलासगतच लागवड करतात.

जिव धोक्यात घालून काम:

व्याघ्रहल्ल्यानंतर शेतक-यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाघ शेतात असल्याने शेतकर्‍यांना शेतात काम करणे कठीण झाले आहे. काही शेतक-यांनी भीतीपोटी काम बंद केलेय. शेती करता येत नसल्यामुळे शेतकर्‍यांवर आर्थिक पेच वाढत आहे. शेतकर्‍यांच्या अडचणी लक्षात घेऊन वन अधिकारी त्यांना सुरक्षा देताहेत. मानवी-वन्यजीव संघर्षाची परिस्थिती उद्भवू नये आणि शेतकर्‍यांचेही नुकसान होऊ नये म्हणून सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतक-यांच्या सुरक्षेसाठी वन कर्मचारी तैनात असतात.

दिवसरात्र 30 कर्मचारी तैनात: 

आरएफओ वैष्णवी जरे सांगतात शावक सोबत असल्याने कुणाही व्यक्तीने आसपास जाणे धोकादायक आहे. वाघाने 4 शावकांना जन्म दिला असून त्यापैकी 2 नर व 2 मादी आहेत. शावकांचे अद्याप डोळेदेखील उघडलेले नाहीत. वाघांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी आवारात 19 कॅमेरे बसविण्यात आले आहेत. वाघिण शेताकडे जाऊ नये म्हणून सौर कुंपण केले गेलेय. शावकं खूपच लहान असल्याने तिला सध्याच शेत सोडणे कठीण आहे. वाघाचे परीक्षण करण्यासाठी वन कर्मचार्‍यांनी आवारात 5 के 6 मचान उभारून 24 तास तैनाती राखली आहे. 15 एसटीपीएफसह एकूण 30 वन कर्मचारी एकजुटीने कार्यरत आहेत.

ड्रोनद्वारे निरीक्षण:  शावकांवर ड्रोनद्वारे निरीक्षण ठेवले जात असल्याचे उपवनसंक्षक प्रभुनाथ शुक्ला सांगतात. एनटीसीएच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वाघिन आणि तिचे पिलांची देखभाल केली जात आहे.शेतात काम करणा-यांसाठी ढाल म्हणून वनरक्षक कर्तव्य करून शेतक-यांना मदत करीत आहे. शावकांच्या आवाजाची व आजूबाजूला बसविलेल्या कॅमे-यांत वाघिनीची अनेक छायाचित्रे कैद झाली आहेत. याशिवाय वाघिणीने शेतकर्‍यांवर हल्ला करु नये, म्हणून त्यांना समुहानेत शेतिकाम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, काम करतेवेळी मोठ्याने संवाद राखणे व रात्री शेतात काम न करण्याचा सल्ला दिला आहे.

Nagpur Updates

Nagpurupdates is your local/Digital news, entertainment, Events, foodies & tech website. We provide you with the happening news, Page3 Contain and all about Nagpur Foodies & Infrastructure from the Nagpur and world.

Related Articles

Back to top button

Adblock Detected

Disable Your Add Block To View Page.