संजय राऊत व सेना पदाधिकारी यांचेवर त्वरित गुन्हा दाखल करा: हेमंत गडकरी

मनसे तर्फे शिवसेना नेते राज्यसभा सदस्य संजय राऊत यांचेवर तसेच सभा आयोजकांवर आर्म ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी व शहर अध्यक्ष विशाल बडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसे शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्त श्री नरुल हसन साहेब व हुडकेशवर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षका कविता इसारकर यांची भेट घेऊन संबधित प्रकरणावर विस्तृत चर्चा करून तक्रार दाखल केली, दि 21 एप्रिल रोजी नागपुरातील बेसा पॉवर हाऊस चौक येथे राऊत यांच्या सभेत शिवसेने तर्फे तलवार भेट दिली असता ती त्यांनी उपस्थित जनसमुदायाला उंच करून दाखविली ,12 एप्रिल रोजी ठाणे येथे झालेल्या सभेत मनसे अध्यक्ष राजसाहेब यांनी ठाणे पदाधिकारी यांनी तलवार भेट दिली असता ती उंचावून उपस्थित लोकांना अभिवादन केले होते त्यानंतर ठाणे पोलिसांनी आर्म ॲक्ट नुसार गुन्हा नोंदविला होता, तोच प्रकार राऊत यांच्या सभेत झाल्याने आता त्वरित त्यांचेवर सुद्धा गुन्हा दाखल करावा कारण कायदा सर्वांना समान आहे असे मनसेच्या वतीने हेमंत गडकरी व विशाल बडगे यांनी यावेळी पोलीस अधिकाऱ्याशी चर्चा केली.

