Politics
अखेर महामेट्रो नमली-मनसेच्या मागणीला यश.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपुर शहरा तर्फे नुकतेच नागपुर महामेट्रो यांना प्रदेश सरचिटणीस मा. हेमंतजी गडकरी यांच्या मार्गदर्शनात व नागपुर शहर अध्यक्ष श्री.विशाल बडगे व मध्य विभाग अध्यक्ष शशांक गिरडे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आलेले होते.त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने असलेले छत्रपती चौक येथील मेट्रो स्टेशनच्या फलकावर असलेले नाव व त्यापुढील मजकूर काढण्यात यावा.तसेच शहरातील कोणत्याही महापुरुषांच्या नावसमोर कोणत्याही अस्थापणेचे नाव लिहण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आलेली होती. व न-केल्यास रस्त्यावर उतरू अशी ताकीद देण्यात आलेली होती. अखेर मेट्रो तर्फे सुधारित फलक लावण्यात आले.