NMC
शासनाच्या निर्देशांचे पालन करा : आयुक्त
महानगर पालिकेचे आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल नागरिकांचे अभिनंदन करीत आभार मानले. ते म्हणाले की, शनिवारी नागरिकांनी जसा उत्स्फूर्तपणे कर्फ्यू पाळला तसाच रविवारीही जनता कर्फ्यू पाळावा. आता अशा पध्दतीने जगणे शिका, हे सांगण्यासाठीच हा जनता कर्फ्यू आहे. राहणीमानात बदल करण्याने आणि शासनाच्या निर्देशांचे योग्य प्रकारे पालन केले तर कोरोनावर नियंत्रण मिळविता येईल. आपल्या जीवाची पर्वा करा, लॉकडाऊन किंवा जनता कर्फ्यूची गरज भासणार नाही, अशी जीवनपद्धती आत्मसात करा, असेही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटले.
आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी शनिवारी जनता कर्फ्यूचे निरीक्षण करण्यासाठी गोकुलपेठ, सीताबर्डी, इतवारी, मस्कासाथ, सेन्ट्रल एव्हेंन्यू भागाचा सकाळी दौरा केला.
News Credit To NMC