पूर्व मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण यांची नागपूर मेट्रोला भेट
नागपूर, २३ डिसेंबर : पूर्व मुख्यमंत्री व विधानसभा सदस्य श्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज नागपूर मेट्रो प्रकल्पाला भेट दिली. श्री चव्हाण यांनी सिताबर्डी इंटरचेंज ते शंकर नगर मेट्रो स्टेशन दरम्यान मेट्रोने प्रवास केला. सर्वप्रथम त्यांनी महा मेट्रोच्या मेट्रो भवनला भेट दिली. महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी त्यांचे स्वागत केले.
या भेटीदरम्यान डॉ. दीक्षित यांनी श्री. चव्हाण यांना नागपूर मेट्रो रेल प्रकल्पा बद्दल संपूर्ण माहिती प्रदान केली तसेच महा मेट्रो तर्फे पुणे मेट्रो तसेच अन्य प्रकल्पाची माहिती देण्यात आली तसेच महा मेट्रो तर्फे विश्व कीर्तिमान स्थापित अश्या वर्धा मार्गा वरील डबल डेकर पुला बद्दल माहिती प्रदान केली या व्यतिरिक्त स्टेशन परिसरातील प्रवाशांच्या सोयीसाठी देण्यात आलेल्या विविध सुविधाबद्दल सविस्तर माहिती प्रदान करण्यात आली.
या भेटीदरम्यान श्री. पृथ्वीराज चव्हाण यांनी शंकर नगर मेट्रो स्टेशन येथे व्हिजिटर बुक मध्ये नमूद केले कि, नागपूर मेट्रो रेल प्रकल्प भरपूर पुढे गेला असून मेट्रो स्टेशनचे डिझाईन सुंदर असून मोठ्या प्रमाणात नागरिक मेट्रोचा उपयोग करीत असून नागपूर आंतरराष्ट्रीय शहराच्या दिशेने ने मोठे पाऊल घेतले आहे. तसेच महा मेट्रोचे मेट्रो भवन देखील सुंदर असून नागपूर मेट्रो प्रकल्पाची अतिशय सुयोग्यपणे अंमलबजावणी झाल्या बद्दल महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
या वेळी पूर्व मंत्री श्री. राजेंद्र मुळक महा मेट्रोचे संचालक श्री अनिल कोकाटे कार्यकारी संचालक श्री. उदय बोरवणकर उपस्थित उपस्थित होते. श्री दीक्षित यांनी श्री चव्हाण यांना स्मृतीचिन्ह भेट दिले.