गणेशोत्सव २०२०: कोरोना रुग्णालयाचाच सजावटीत देखावा
नागपूर:- देशभरात पसरलेलेल्या कोरोनामुळे सर्वसामान्य पठडीतले जिवन बदलले आहे. दरम्यान, यंदाच्या गणेशोत्सवालाही मर्यादा आखून दिल्या गेल्या आहेत. मंडळांना अनेक बंधने टाकत मंडप लावण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशातही नागपूरच्या हिलटॉपच्या राजा च्या मंडपात कोरोना केअर हॉस्पिटलची संरचना देखावा करण्यात आला आहे.
जो सर्वांसाठीच आकर्षणाचे केंद्र ठरत आहे, या सजावटीमध्ये भगवान गणेश कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णावर उपचार करीत आहेत, भगवान गणेशाला डॉक्टर म्हणून चित्रित केले आहे, भगवान गणेशाच्या पुढे पॅरामेडिकल कर्मचारी तसेच पोलिस कर्मचारी आहेत. , कोरोना रूग्ण ज्यांच्यावर भगवान गणेश डॉक्टर म्हणून उपचार करीत आहेत, तो रुग्ण ऑक्सिजनवर आहे, संपुर्ण मंडप कोरोना केअर हॉस्पिटल नावाचा म्हणून तयार करण्यात आला आहे, कोरोनाशी लढ्यात देव मानवाच्या बाजूने आहे असे दाखविले गेले आहे.