गणेशोत्सव: मुर्तिकार संभ्रमात, मंजूरीत अडचण
नागपूर:- कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि सोशल डिस्टंसींगचे उडणारे धिंडवडे लक्षात घेता मनपा प्रशासनाने गणेशमंडळांना सौम्य पातळीवर गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले गेलेय, तर दुकानदारांनाही काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्यायत. पण वर्षभर केवळ सणांच्या वेळी हा व्यवसाय करणा-या या शिल्पकारांना दिलासा देण्याची मागणी मनपा प्रशासनाकडे केली जात होती.
जरी काही लोकप्रतिनिधींनी या शिल्पकारांबाबत योग्य ते निर्णय घेण्याची मागणी केली होती. परंतु गणेशमूर्ती विक्रीसाठी आवश्यकतेनुसार मंजुरी मिळण्यासाठी दुकानदारांना बरीच मेहनत घ्यावी लागत आहे. प्रशासनाकडून यांसाठी स्वतंत्र असे काही नसल्याचे उघडकीस आल्याने मूर्तिकार गोंधळाच्या स्थितीत आहे.
झोन कार्यालयाकडून कोणताही प्रतिसाद नाही:
गांधीबाग झोन अंतर्गत हे मूर्ती व्यापारी येतात. विभागीय कार्यालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे कार्यालय बंद झाल्याने कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तर सण आता काहि दिवसांवर आला आहे. मर्यादित प्रमाणात मुर्त्यांचा व्यापार होत असला तरी सणांच्या वेळी होणारी गर्दी लक्षात घेता अधिक जागेची आवश्यकता असते. ज्यासाठी मान्यता आवश्यक आहे. एकीकडे पारंपारिक पद्धतीने मूर्ती तयार करणा-यांवर संकट आहे, तर पीओपी मूर्तींचेही बाजारात आगमन झाल्याने दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे.
मनपा प्रशासनाच्या उच्च अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, मिशन बिगीन अगेनच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार आड-इव्हनमध्ये दुकान उभारले गेले असले, तरी उत्सवाच्या वेळी मूर्तींसाठी होणारी गर्दी लक्षात घेता या दुकानदारांना ऑड इव्हन पद्धतीसह व्यवसाय करण्याचे सुचविले आहे. गर्दीमुळे केवळ लोकांनाच नव्हे तर दुकानदारांनाही अडथळा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा सूचना केवळ लोकहितासाठी केल्या जात आहेत. ज्याचे त्यांनी अनुसरण केले पाहिजे.