कचरा संकलन कंपनीमुळे कर्मचारी त्रस्तन महापौरांची घेतली भेट
नागपूर:- शहरातील कचरा संग्रहण सुरळीत व्हावे या उद्देशाने जुनी कंपनी बदलत नव्या एजी एन्व्हिरो कंपनीला मनपाकडून 5 झोनसाठीचे कंत्राट देण्यात आले, परंतु कंपनीच्या कर्मचा-यांनीवतीने महापौर संदीप जोशी यांना निवेदन दिले गेले, ज्यामध्ये अनेक प्रकारच्या त्रासांचा उल्लेख करून कंपनीला आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्याची विनंती केली गेलीय.
यावेळी मनपा विधी समितीचे अध्यक्ष देखील उपस्थित होते. कर्मचार्यांच्या शिष्टमंडळाने सांगितले की कोरोनाच्या या संकटातही कर्मचारी घरोघरी जाऊन कचरा गोळा करीत आहेत. मात्र, सफाई कामगार आणि वाहनचालकांसाठी कंपनीकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात नाहीत.
चर्चेदरम्यान शिष्टमंडळाने सांगितले की एजी एन्वायरो कंपनी लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली आणि नेहरूंगर झोनमार्गे कचरा संकलन करीत आहे. कर्मचार्यांच्या वतीने दररोज कचरा गोळा केला जात आहे. परंतु कंपनीकडून कधी पगार कपात केली जाते, तर काही वेळेस निर्धारित वेळेपेक्षा जास्त काम करवले जात आहे. साप्ताहिक सुट्टीसुद्धा बर्याच वेळा रद्द केली जात आहे. अशा अनेक समस्यांमुळे कर्मचारी अस्वस्थ आहे. चर्चेनंतर महापौरांनी अतिरिक्त आयुक्त, आरोग्य उपायुक्त यांना कर्मचारी नेत्यांसमवेत बैठक घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.