रांगेतून सुटका: महामेट्रोचे मोबाइल अॅप उपलब्ध
नागपूर: आता मेट्रो ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी रांगेत लागून तिकीट खरेदी करण्याची गरज नाही. रांगेच्या कटकटीतून विश्रांती मिळणार आहे. महामेट्रोने नागपूर मेट्रो प्रवाशांसाठी महामेट्रोचे मोबाइल अॅप उपलब्ध करून दिले आहे. या अॅपमधील क्यूआर कोड वापरून तिकिटे खरेदी केली जाऊ शकतात. या सुविधेमुळे प्रवाशांचा वेळ वाचेल तसेच मौल्यवान कागदाची बचत होईल आणि पर्यावरणालाही मोलाची मदत होईल.
असे करा अॅप डाउनलोड: Play Store किंवा App Store वर ‘नागपूर मेट्रो रेल’ शोधून मोबाईल अॅप डाउनलोड करता येते.
एकदा अॅप डाऊनलोड झाल्यावर ‘बुक तिकीट’ पर्यायावर क्लिक करा.
तुम्हाला नोंदणी करण्यास सांगितले जाईल.
तुम्हाला तुमचे नाव, आडनाव, जन्मतारीख, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर द्यावा लागेल.
आपल्याला पासवर्ड तयार करण्याची देखील आवश्यकता असेल.
गंतव्य स्थान आणि प्रवासी संख्या प्रविष्ट केल्यानंतर, आपल्याला आपले डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग किंवा भीम यूपीआय वापरून भाडे भरणे आवश्यक आहे.
मोबाईल अॅप वापरकर्त्यांसाठी खूप फायदेशीर
हे अॅप जवळच्या मेट्रो स्टेशनचे मेट्रो मार्ग, भाडे, अंतर आणि नेव्हिगेशन वेळेबद्दल माहिती प्रदान करते. हरवलेल्या, सापडलेल्या सामानाची माहिती सुद्धा अपलोड करण्याव्यतिरिक्त ग्राहकांच्या प्रतिक्रिया आणि तक्रारी देखील हि अॅप प्रदान करते. नागपूरच्या पर्यटन स्थळांसह त्याच्या जवळच्या मेट्रो स्टेशनची माहिती देखील प्रदान केली आहे. तसेच मेट्रो स्टेशन आणि मेट्रो ट्रेनच्या वेळेबद्दल माहिती देखील प्रदान करते.