पालकमंत्री हिटलर शाही करताहेतः आमदार व्यास
नागपूर:- भाजपचे आमदार गिरीश व्यास यांनी पालकमंत्री नितीन राऊत यांच्यावर हिटलरशिप केल्याचा आरोप केला, ते म्हणाले कोरोना संदर्भात लॉकडाउन निर्णयासाठी अधिका-यांची एक समिती स्थापन केली आणि त्या समितीत महापौराचाच समावेश केला नसल्याचे सांगितले. त्याउलट कोरोना साथीचा संसर्ग थांबविण्यासाठी स्वत: महापौर संदीप जोशी रस्त्यावर उतरले व नागरिकांना, दुकानदारांना कोविड -१९ च्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करण्याचे आवाहन करित आहेत.
महापौरांच्या आवाहनाचा परिणाम असा झाला की संपूर्ण जनतेने दोन दिवसाच्या जनता कर्फ्यूत जोरदार समर्थन दिले. परंतु पालकमंत्री कदाचित यामुळे चिडले होते आणि त्यांनी आपल्या हक्कांचा गैरफायदा घेतला आणि खालच्या पातळीचे राजकारण करीत अधिका-यांची समिती गठीत केली. शहरातील प्रथम नागरिक, महापौरांचा तसेच नागरिकांचा हा अपमान आहे.
रक्षाबंधनास करीत आहे लक्ष्य: व्यास यांनी आरोप केला आहे की हिटलरशाहीसारख्या पद्धतीने भावाबहिणींचा घराघरांत साजरा होणारा रक्षाबंधन सणाला लक्ष्य करत पालकमंत्री यांनी ईदनंतर लॉकडाउनच्या अधिका-यांना छुप्या सूचना दिल्या आहेत. यासह, लोकांच्या घरात आयोजित केलेल्या अयोध्यामधील राम मंदिराचे भूमिपूजन विस्कळीत करण्यासाठी त्यांनी कुटिल हालचाली आखल्या आहेत. त्यांच्या या हालचाली सर्वांसमक्ष खुल्या झाल्याने भाजपमधील सर्व लोकप्रतिनिधी आणि नागरिकांमध्ये संताप आहे.
व्यास म्हणाले की, त्यांची हिटलरशिप मुळीच खपवून घेतली जाणार नाही. ते म्हणाले की आजपर्यंत त्यांनी स्वत: कोणत्याही रुग्णालय किंवा विलगीकरण केंद्राला भेट दिली नाही, उलटपक्षी ३ महिन्यांपासून आर्थिक अडचणीत आलेल्या नागरिकांना भरमसाठ वीजबिल पाठवून त्रास देत आहेत.