होम क्वॉरंटाईनचे ठश्याने हातास इन्फेक्शन
नागपूर:- कोरोना संसर्गकाळात बाहेरगावाहून शहरात येणा-यांना ओळखण्यासाठी, १४ दिवस गृह विलगीकरणासाठी त्यांचे हातावर शिक्के लावले जात आहेत, अशात पुण्याहून नागपुरात अालेल्या एका जोडप्याचे हातावर विमानतळावर होम क्वारेन्टाईनचे शिक्कामोर्तब झाले. पण त्या शाईने आता जखमा झाल्यायत व त्यातून पू बाहेर पडल्याने नातेवाईक घाबरले आहेत.
हे दाम्पत्य ५ जून रोजी पुण्याहून नागपूरला पोहोचले. घरपरतनीवेळी होम क्वारंटाईन म्हणून दोहोंचेही हातांवर शाईने शिक्का मारण्यात आला. दोघेही काही दिवस त्यांचे नातेवाईकाच्या घरी थांबले. त्यानंतर ते गाडीने चंद्रपूरला रवाना झाले. दरम्यान, शाईमुळे हातात संसर्ग झाला. चौकशीत ही शाई महसूल विभागाने उपलब्ध करुन दिलेली असल्याचे कळते. निवडणुकीच्या वेळी बोटाला लावण्याची जी शाई असते तीच ही शाई अाहे. या दोघांनीही नागपुरातील आपल्या नातेवाईकांना माहिती दिली आहे. याक्षणी दोघेही घाबरून गेले आहेत.