नागपुरात आता उष्णतेचाही लॉकडाऊन
नागपूर:- विदर्भात उष्णतेच्या लाटेची संभावना हवामान विभागाने आधीच वर्तविली होती त्याप्रमाणे कालचे दिवसाचे कमाल तापमान 46 अंश पार होते व आजही सलग दुसरे दिवशी 46.7⁰ अशा कमाल तापमानाची नोंद शासकी हवामान खात्याच्या संकेतस्थळावर नोंदवली गेलीय, हे तापमान सरासरीपेक्षा 4 अंशांनी जास्त आहे.
तर या उष्णतेच्या माऱ्यामुळे आधीच लाॉकडाऊन मध्ये त्रस्त सर्व नागपूरकर होरपळून सूर्याचाहि लॉकडाऊन झेलत आहेत, अगदी सकाळपासूनच उष्ण वाऱ्यांनी दिवसाची सुरुवात झालेली आढळते, घरांत व कार्यालयांत कुलर सकाळीच लावलेले आढळताहेत तर दुपारी संचारबंदीत जरी थोडी सवलत मिळाली तरी उष्णता मारा चुकवण्यास्तव रस्त्यावर जराही वर्दळ दिसत नाही, सायंकाळीही या उष्णतेचा वावर उशीरापर्यंत जाणवतोय, पुढील 4 दिवस हि उष्णतेची लाट कायम असणार असा अंदाज असून कमाल तापमान 46 अंशापुढेच राहण्याचे संकेत हवामान विभागाने दिलेले आहेत तरी सर्व नागरिकांनी याविषयक दक्षता घ्यावी.
कोरोना दहशतीने सर्व दवाखान्यांत आधीच सावधगिरीची भूमिका जागोजागी दिसतेय अशात उन्हाच्या त्रासासंबंधीत पेशंट वाढ संभव आहे. आपण घेऊ शकतो त्या सर्व काळजी व उपाय योजना राखत घराबाहेर पडावे, आहारात पाण्याचे प्रमाण वाढवावे, उन्हाचा संपर्क कमितकमी होईल अशी सावधगीरी बाळगावी असा वैद्यक क्षेत्रातील जाणकारांचा सल्ला आहे.