विदर्भात पुन्हा उष्णतेची लाट
नागपूरात गेल्या आठवड्यात पारा 40 अंशावर गेला होता. त्यामुळं मार्च महिन्यातच पारा वाढल्यानं नागरिकांना घाम फुटला होता. : नागपूरसह विदर्भात ढगाळ हवामान असून विदर्भाच्या काही भागात तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तुलनेत तापमानात २ अंश सेल्सिअस घट झाली असली तरी उकाड्याने नागपूरकर हैराण झाले आहेत. उन कमी झालं असलं तरी उकाड्यानं घामाच्या धारा वाहताहेत. लिंबू सरबत आणि उसाच्या रसाचा नागरिकांना आधार घ्यावा लागतोय.
तर पुन्हा उन्हाचे चटके सहन करावे लागणार आहे अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहानिर्देशक मोहन शाहू यांनी दिली आहे.गेल्या दोन दिवसांपासून तापमान घटलंय. 38 अंशापर्यंत तापमान खाली आलंय. मात्र, विदर्भात पुन्हा उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय.