बावनकुळेंनी सांगितला हा आकडा! दर महिन्याला राज्यात किती रकमेची दारू खपते?
नागपूर:- याशिवाय दारूची दुकाने सुरु झाली तर खरेदी करण्यासाठी दुकानांसमोर लोकांची झुंबड उडेल. त्यामुळे सोशल डिस्टसिंगचा प्रश्न निर्माण होईल. ज्या दलित व गरीब परिवारांनी आपल्या घरखर्चासाठी पैसा उभा केला तो दारूत जाईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आज रोजगार नाही, व्यवसाय बंद आहेत, शेतकऱ्याला कोणतीच कमाई नाही, अशा स्थितीत मद्यात पैसा खर्च होणे कुणाच्याही हिताचे नाही.
देशी-विदेशी दारूची दुकाने सुरु केली तर गावातील सामाजिक आणि घरातील पारिवारिक वातावरण बिघडण्यास सुरुवात होईल. आज संचारबंदीमुळे सर्वजण घरात आहेत. दारूची विक्री सुरु झाली हे सर्व जण बाहेर पडतील. त्यामुळे कोणत्याही मद्यविक्रीस कोराना संक्रमण पूर्णपणे थांबेपर्यंत परवानगी देऊ नये, असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.
काही लोकांनी देशी-विदेशी मद्य सुरु करा, अशी विनंती शासनाकडे केली आहे. पण कोरोना संक्रमण थांबणार नाही, तोपर्यंत दारू विक्रीला परवानगी देऊ नये, अशी विनंती बावनकुळे यांनी केली आहे. दोन कोटी 75 लाख लिटर देशी, 1 कोटी 75 लाख लिटर विदेशी तर तीन कोटी लिटर बिअर असा पाच हजार कोटी रुपयांचा व्यवसाय दर महिन्याला राज्यात होतो.
गेल्या महीनाभरापासून दारुची दुकाने बंद असल्यामुळे बव्हंशी लोकांनी दारूशिवाय राहणे शिकून घेतले आहे. अशा परीस्थितीत दारूविक्री सुरु केली तर लोकांनी कुटुंबाच्या पालनपोषणासाठी जो पैसा साठवून ठेवला आहे, तो संपूर्ण नाही पण काही अंशी दारूसाठी खर्च केला जाईल. त्यामुळे घरा-घरांत वाद सुरु होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे बावनकुळे म्हणाले.
देशात आणि राज्यात कोरोनाचे संक्रमण अजूनही सुरुच आहे. हे संक्रमण जोपर्यंत थांबणार नाही, तोपर्यंत देशी-विदेशी दारू विक्रीवर बंदी कायम ठेवावी. जोपर्यंत हे संक्रमण पूर्णपणे थांबणार नाही, तोपर्यंत कोणत्याही प्रकारच्या दारूची विक्री सुरु करु नये, अशी मागणी माजी ऊर्जा आणि उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.