NMC

आठ महिन्यात मनपाने बुजविले शहरातील पाच हजारांवर खड्डे

नागरिकांच्या तक्रारी आणि नियमित कामांतर्गत १ जानेवारी ते ३० ऑगस्ट या आठ महिन्यांच्या काळात शहरातील सुमारे ५०३८ खड्डे नागपूर महानगरपालिकेच्या वतीने बुजविण्यात आले. सुमारे ९४२४० वर्ग फूट परिसर यामाध्यमातून समतल करण्यात आला. हॉट मिक्स प्लान्ट विभाग, जेट पॅचर मशीन आणि इन्स्टा रोड पॅचर मशीनद्वारे हे खड्डे बुजविण्यात आलेत.

महापौर श्री.संदीप जोशी यांनी आयोजित केलेल्या आढावा बैठकीत ही माहिती विभागा मार्फत देण्यात आली. महापौरांनी सांगितले नागपूर शहरात खडडयापासून नागरिकांना त्रास होत आहे. हॉट मिक्स प्लान्ट यांनी तात्काळ खडडे बुजविण्याची कारवाई करावी.
हॉट मिक्स प्लान्टच्या माध्यमातून झोननिहाय करण्यात आलेल्या कामांच्या माध्यमातून ८२५२२.८२ वर्ग मीटर क्षेत्र असलेले ३८७६ खड्डे बुजविण्यात आले. यासाठी स्क्रॅप ३४ ट्रीप, डब्ल्यूबीएम ३२८.५ ट्रीप, बीएम २० ट्रीप आसणि एस.डी.सी.सी./बी.सी. ३१५ ट्रीपचा वापर करण्यात आला. जेट पॅचरच्या माध्यमातून ४३२४.८२ वर्ग मीटर क्षेत्रातील ३१२ खड्डे तर इन्स्टा रोड पॅचरच्या माध्यमातून ७३९४.५७ वर्गमीटर क्षेत्र असलेले ८५० खड्डे बुजविण्यात आले. बैठकीत कार्यकारी अभियंता श्रीमती सोनाली चव्हाण, मॅकेनिकल इंजीनियर योगेश लुंगे, उप अभियंता कमलेश चव्हाण उपस्थित होते.

बुजविलेल्या खड्ड्यांची झोननिहाय माहिती

हॉट मिक्स प्लान्टच्या माध्यमातून १ जानेवारी ते ३० ऑगस्टदरम्यान बुजविण्यात आलेल्या खड्ड्यांची झोननिहाय माहिती पुढीलप्रमाणे आहे. लक्ष्मीनगर झोनमध्ये ९०६५.३४ क्षेत्रफळावरील ५२३ खड्डे, धरमपेठ झोनमध्ये ८४०२.१४ क्षेत्रफळावरील ३८५ खड्डे, हनुमाननगर झोनअंतर्गत ७४४०.४४ वर्गमीटर क्षेत्रफळावरील ३८० खड्डे, धंतोली झोनअंतर्गत ५९५५.९१ वर्गमीटर क्षेत्रफळातील २४८ खड्डे, नेहरूनगर झोनमध्ये १४९८७.८३ क्षेत्रफळावरील ६८० खड्डे, गांधीबाग झोनअंतर्गत ४६१७.९७ क्षेत्रफळावरील ३३४ खड्डे, सतरंजीपुरा झोनअंतर्गत २३५१.८ वर्गमीटर क्षेत्रफळ असलेले १३६ खड्डे, लकडगंज झोनअंतर्गत ५२८७.४९ वर्गमीटर क्षेत्रफळ असलेले २३१ खड्डे, आशीनगर झोनअंतर्गत ११३४४.७१ क्षेत्रफळावरील ३८४ खड्डे आणि मंगळवारी झोनअंतर्गत १३०६९.१९ वर्गमीटर क्षेत्रफळावरील ५७५ असे एकूण ८२५२२.८२ क्षेत्रफळावरील ३८७६ खड्डे हॉटमिक्स विभागाच्या माध्यमातून बुजविण्यात आले.

News Credit To NMC

Team Nagpur Updates

Nagpur Updates is your local/Digital news, entertainment, Events, foodies & tech website. We provide you with the happening news, Page3 Contain and all about Nagpur Foodies & Infrastructure from the Nagpur and world.

Related Articles

Back to top button
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Adblock Detected

Disable Your Add Block To View Page.