महाराष्ट्रात आम आदमी पार्टीने ग्रामपंचायत निवडणुकीत १०५ जागांवर मारली बाजी
‘आप’ने महाराष्ट्राच्या राजकारणात पाय रोवण्यास केली सुरुवात; 13 जिल्ह्यात विविध ग्रामपंचायती मध्ये १०५ जागा जिंकल्या! आपच्या विजयापैकी ५०% पेक्षा जास्त स्त्रिया विजयी झाल्या; दिल्ली विकासाचे व सुशासनाचे मॉडेल महाराष्ट्रात आणण्याचे पार्टीचे वचन!
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आम आदमी पार्टीने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेत्रदीपक पदार्पण केले. जवळजवळ पार्टीच्या ५०० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी या निवडणुका लढवल्या आणि ग्रामीण महाराष्ट्रात एकुण ९६ सदस्य विजयी ठरले.
आम आदमी पार्टी च्या सहाय्याने यवतमाळ, लातूर, नागपूर, सोलापूर, नाशिक, गोंदिया, चंद्रपूर, पालघर, हिंगोली, अहमदनगर, जालना, आणि भंडारा
जिल्ह्यातील जागा जिंकल्या असून एकूण विजयापैकी ५०% पेक्षा जास्त स्त्रिया उमेदवार विजयी झाल्या आहेत.
“महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भूमी आहे. लोक स्वराज्य, सामाजिक समानता आणि समान विचारसरणीच्या बाजूने बांधलेल्या एका पक्षाच्या मागे लोकांची पसंती मिळत आहे आहे, हे योग्य असून सर्वांना संधी मिळणे गरजेचे आहे
हा खरोखर स्वच्छ राजकारणाचा विजय आहे आणि एक नवीन राजकीय संस्कृती आपच्या माध्यमातून दिसून आली. आमच्या राजकीय विरोधकांनी साम दाम दंड व भेद अशी सर्व विभाजनकारी शस्त्रे वापरुनही आपचे उमेदवार विजयी झाले हे उल्लेखनीय आहे. आमचे नेते श्री अरविंद केजरीवालजी यांचे नेतृत्व आणि
आपच्या विकासाचा नीतीचा हा विजय आहे. राज्य संयोजक श्री रंगा राचुरेजी आणि सह-संयोजक श्री किशोर माध्यम जी यांच्या नेतृत्वात कठोर परिश्रम
घेतलेल्या आमच्या कार्यकर्त्याचे मी अभिनंदन करतो.
आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव धनंजय शिंदे म्हणाले की, निवडून आलेल्या प्रतिनिधी ग्रामपंचायतींमध्ये चांगले कार्य करू शकेल अशी
परिवर्तनशील भूमिका व विकास या दोन्हीच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्यासाठी सक्षम आहेत. आम्ही आमच्या सर्व मतदारांचे आणि महाराष्ट्रातील
जनतेचे आभार मानतो ज्यांनी आपल्यावर मोठा विश्वास दाखवला व जबाबदारी दिली”.
आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व प्रवक्त्या प्रीती शर्मा मेनन म्हणाल्या.
“आमच्या दिल्लीतील सरकारने सुशासन म्हणजे काय हे दाखवून दिलेले असून आता दिल्ली विकास मॉडेलचे संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच अनुकरण होईल असा
विश्वास वाटतो.”
“ही केवळ एक सुरुवात आहे, प्रस्थापित राजकीय पक्षांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे आणि आम्ही राज्यभरातील आगामी स्थानिक स्वराज्य
संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपले स्थान आणखी मजबूत करण्याची आशा करतो.”
विशेष करून विदर्भात पार्टी समर्थित सदस्य मोठ्या प्रमाणात निवडून आले आहेत, या सर्व सदस्यांचे विदर्भ संयोजक देवेंद्र वानखडे, राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंग, विदर्भ संगठनमंत्री परोमिता गोस्वामी, श्री नितीन
गवळी, पश्चिम विदर्भ संयोजक अन्सार शेख, राष्ट्रीय परिषद सदस्य अंबरीश सावरकर, अशोक मिश्रा, कविता सिंगल, श्री वसंतराव धोके, श्री सुनील मुसळे,
लक्षमण कोल्हे, श्री विजय माल्थाने, पुरुषोत्तम मोदी, उमेश दमाये, स्वप्नील भोंगाडे, श्री केशव बांते, प्रशांत येरणे, ईश्वर गजबे, गणेश रेवतकर, श्री प्रताप गोस्वामी, श्री चौधरी यांनी अभिनंदन केले.
ग्रामपंचायत निवडणूक २०२१ मध्ये विदर्भातील जिल्हा निहाय निवडून आलेल्या सदस्यांची यादी
नागपूर जिल्हा – कुही तालुका : मुसळगाव-कटारा-चीपडी गट ग्रामपंचायत मध्ये
९ पैकी ६ सिट
- सौ. हर्षलता बांडेबुचे – ३२१, कटारा, कुही तालुका
- श्री. चंदू ठवकर – ३१६ कटारा, कुही तालुका
- सौ. कविता महाजन – ३०४ कटारा, कुही तालुका
- श्री. सहादेव राजेराम पुडके – बिनविरोध चीपडी, कुही तालुका
- सौ. दमयंतीताई अभिमन अडिकणे – बिनविरोध चीपडी, कुही तालुका
- सौ. श्रुखंलाताई हेमंत तलवारे – बिनविरोध चीपडी, कुही तालुका
चंद्रपूर जिल्हा – एकूण विजयी सदस्य संख्या ९
- सौ.संगीता मेश्राम( आप) भान्सुली ग्रामपंचायत, चिमुर तालुका
- वैशाली ताजणे (आप) भान्सुली ग्रामपंचायत, चिमुर तालुका
- दीपक ननावरे (आप) अमरपुरी, चिमुर तालुका
- कवडू वाकडे (आप) आंबेनेरी, चिमुर तालुका
- प्रदीप रमेश बोढे (आप ) बिनविरोध विसापूर – भद्रावती तालुका
- सौ नंदाताई धनराज बोढे (आप) बिनविरोध – भद्रावती तालुका
- सौ. स्नेहल बन्सोड (आप) देलनवाडी, सिंदेवाही तालुका
- सौ. विद्या कांबळे (आप) डोंगरगाव, सिंदेवाही तालुका
- सौ.पुजा वाकडे (आप) मारेगाव, सिंदेवाही तालुका
भंडारा जिल्हा – एकूण विजयी सदस्य संख्या ३
- श्री. प्रशांत लकडसवार – भोजपूर ग्रामपंचायत, पवनी तालुका
- सौ सरिता नागपुरे – भोजपूर ग्रामपंचायत, पवनी तालुका
- श्री शेखर तैताकर कचरखेडा ग्रामपंचायत, – भंडारा तालुका
गोंदिया जिल्हा – – एकूण विजयी सदस्य संख्या ३
- सौ. मंगला मरस्कोल्हे, घोगरा ग्रामपंचायत तिरोडा तालुका
- सौ. पुनम चौरे , घोगरा ग्रामपंचायत तिरोडा तालुका
- सौ. योगीता डोंगरे , घोगरा ग्रामपंचायत तिरोडा तालुका
बुलढाणा जिल्हा – एकूण विजयी सदस्य संख्या १४
- श्री संतोष सातव – मालेगाव गोंड ग्रामपंचायत, नांदुरा तालुका
- श्री हरिओम अवकाले – मालेगाव गोंड ग्रामपंचायत, नांदुरा तालुका
- सौ. सपना गणेश ठाकरे (बिनविरोध- मालेगाव गोंड ग्रामपंचायत, नांदुरा तालुका
पिंपळखुटा ग्रामपंचायत सात पैकी पाच विजयी (नावे बाकी आहेत)
रुधाना-वखाना ग्रामपंचायत सहा विजयी (नावे बाकी आहेत)
यवतमाळ जिल्हा – एकूण विजयी सदस्य संख्या १५
- श्री राजू जनार्धन पाटील – सुकळी ग्रामपंचायत, तालुका आर्णी
- सौ. रंजांना उदय जाधव – सुकळी ग्रामपंचायत, तालुका आर्णी
- सौ. गीता दिनेश बोतुम्बे – सुकळी ग्रामपंचायत, तालुका आर्णी
- श्री. चंद्रकांत पांडुरंग मोरे- सुकळी ग्रामपंचायत, तालुका आर्णी
- सौ. नेहा गोपाल राठोड – सुकळी ग्रामपंचायत, तालुका आर्णी
- श्री गौरव राजेश सावरकर – पारडी नकसरी ग्रामपंचायत – तालुका घाटंजी
- श्री. वासुदेव बापूराव कुंडेकर – चीचबर्डी प्रीम्परी इजारा ग्रामपंचायत, तालुका यवतमाळ
- सौ. जयश्री किशोर राठोड – चीचबर्डी प्रीम्परी इजारा ग्रामपंचायत, तालुका यवतमाळ
- श्री. नंदकिशोर कुमरे – चीचबर्डी प्रीम्परी इजारा ग्रामपंचायत, तालुका यवतमाळ
- सौ. जोती सत्यदेव कुमरे – चीचबर्डी प्रीम्परी इजारा ग्रामपंचायत, तालुका यवतमाळ
- श्री. शानू चीताजन रामगडे- चीचबर्डी प्रीम्परी इजारा ग्रामपंचायत, तालुका यवतमाळ
- सौ. रेणुका प्रकाश पवार – विरूळ कवठा ग्रामपंचायत, तालुका घाटंजी
- श्री. अश्विनी यशवंत पेंदरे – विरूळ कवठा ग्रामपंचायत, तालुका घाटंजी
- श्री. अतुल नागदेव लसंगे – विरूळ कवठा ग्रामपंचायत, तालुका घाटंजी
- श्री दत्तत्रय ब्रम्हटेके टेबुरघरा ग्रामपंचायत, तालुका उमरखेड
- सौ. रत्नमाला प्रकाश नौघरे – गोपाळपूर ग्रामपंचायत – ता. वणी
- श्री शंकर काकडे – मुकुटबन ग्रामपंचायत, ता वणी
- सौ. सुमिता फजकुलवार – मुकुटबन ग्रामपंचायत, ता वणी
१९. सौ. प्रभा पारशिंडे – मुकुटबन ग्रामपंचायत, ता वणी
२०. श्री गणेश असुटकर – मुकुटबन ग्रामपंचायत, ता वणी
२१. विठाबाई बारलावर – मुकुटबन ग्रामपंचायत, ता वणी
२२. सौ. सुधाबाई गंडूलवार – मुकुटबन ग्रामपंचायत, ता वणी
२३. सौ. संगीता खारगडे- अडेगाव, ता. वणी
२४. श्री नानाजी बापूराव पारखी – मानकी ग्रामपंचायत ता.वणी
२५. सौ. वंदना पिपराडे – मानकी ग्रामपंचायत ता.वणी
२६. सौ. सुवर्षा खांडरे – मांडवी ग्रामपंचायत, ता. वणी
२७. श्री संतोषभाऊ पंद्गडीवार – मांडवी ग्रामपंचायत, ता. वणी
२८. श्री अभय तोड्साम – मांडवी ग्रामपंचायत, ता. वणी
२९. मंजुबाई पेंदोर – मांडवी ग्रामपंचायत, ता. वणी
३०. हनुमंतभाऊ कापप्रेकीवर – कोपा ग्रामपंचायत, ता. वणी
३१. कल्पनाताई पालीबार – कोपा ग्रामपंचायत, ता. वणी
३२. निलेशभाऊ आळतकर – मंगरूळ ग्रामपंचायत, ता. वणी
३३. सौ. नंदा खिरटकर – कोलगाव ग्रामपंचायत ता.वणी
३४. सौ वर्षा निबड – कोलगाव ग्रामपंचायत ता.वणी
३५. सौ. लीलाबाई आत्राम – वंजरा ग्रामपंचायत ता.वणी
३६. श्री विठ्ठलराव आत्राम – वंजरा ग्रामपंचायत ता.वणी
३७. श्री सुधाकर आत्राम – दुभाटी ग्रामपंचायत, ता. वणी
३८. सौ नंदाबाई बोबडे- राजुर ग्रामपंचायत, ता. वणी
३९.सौ. अर्चनाताई संजयवार – घोनसा ग्रामपंचायत, ता. वणी
४०. श्री गणेश कावडे – घोनसा ग्रामपंचायत, ता. वणी
४१. किरण आडे, बेलदरी ग्रामपंचायत, ता. महागाव
वरील माहिती प्रसिद्धी करिता सादर.