वर्धा रोड वरील डबल डेकर पुलाचे उद्घाटन
नागपूर: वर्धा रोडवरील डबल डेकर पुलाचे काल धडाक्यात उद्घाटन करण्यात आले, जनतेसाठी पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने वाहतूक कोंडी सुटत ही दिवाळी उत्तम भेट ठरणार आहे. जवळपास ३९१ कोटी बांधकाम खर्चाच्या ४ किलोमीटर लांबीच्या या डबल-डेकर पुलाचे, आर ओ बी व आर यु बीचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते या करण्यात आले.
तब्बल पाच वर्षांने या पुलाचे बांधकाम पुर्णत्वास येऊन लोकार्पण झाल्याने वहातुक कोंडी टळून लोकांची वेळेचीही बचत होईल. एयरपोर्ट साऊथ स्टेशन कनेक्शन सेंटर मधे झालेल्या उद्घाटन सोहळ्यात पालकमंत्री नितिन राऊत, गृहमंत्री अनिल देशमुख, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, कृपालजी तुमाने, अनिल महात्मे, मोहनजी मते, कृष्णाजी खोपडे, विकास कुंभारे, प्रविण दटके, मध्य रेल्वेचे डि आर एच रिचा खरे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी राजीव अग्रवाल, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर ब्रिजेश दीक्षित, प्रकल्प संचालक महेश कुमार, कार्यकारी संचालक अनिल कोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रकल्पात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 391 कोटीची गुंतवणूक केली असून या प्रकल्पाचे बांधकाम महामेट्रोने केले आहे.
ना. गडकरी यावेळी म्हणाले की महामेट्रोने देशातील पहिला डबल डेकर पुलाचे काम करून नागपूरकरांना दिवाळीची अतुलनीय भेट दिली आहे. असाच पुल कामठी आणी कळमना येथेही निर्मिती केली जात आहे, रेल्वेच्या सहयोगाने वर्धा, चंद्रपूर, अमरावती, रामटेक, छिंदवाड़ा पर्यंत मेट्रोचा विस्तार होणार आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले स्थापत्यकलेची हि दिवाळी भेट आहे, २००८ पासून मनिष नगर साठी हे प्रयत्न सुरू होते, २०१४ ला परवानगी भेटली. कैक अडचणी निस्तारत आज ते काम पुर्णत्वास उभे आहे इंजिनियर आहे. गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले ब्रॉडगेज मेट्रो काटोल व नरखेड पर्यंत नेण्याचे प्रयत्नात राज्य शासन तयार असून केंद्राने मदत द्यावी.
कार्यक्रमापश्चात पत्रकारांशी बोलतांना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी म्हणाले, सदर कामात देवेंद्र जींचा मतदार संघ असताना त्यांनी काळजी घेतली ती अशी की एकही घर वा जागा यात गेली नाही हे विचारात घेण्यासारखे आहे, याचकारणाने मुळ डिजाइन त्यांच्याच कल्पनेप्रमाणे अनुसरून कैक निवृत्तांचे रहिवास यात जाण्यापासून वाचवले. देवेंद्र फडणवीस यांनी स्थापत्याच्या या विरळ्या शैलीस पाठबळ देणा-या गडकरींचे कौतुक केले, ते म्हणाले किमान खर्चात कमाल फायदे देणारं काम कसं करता येईल हा कटाक्ष ना. गडकरींकडे आहे, देशभरात या पद्धतिने अनेक ठिकानी या बदलासह महामार्गांवर विकासकामे करता येतील.