पीपीई कीट घालून कोव्हीड सेंटरची पाहणी; तुकाराम मुंढे इन अॅक्शन
नागपूर:- आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील वाढत्या करोना पॉझीटीव्ह रूग्णांच्या संख्येवर चिंता व्यक्त करीत आठवडयाभरापुर्वी मेडीकल व मेयोतील कोव्हीड सेंटरची पाहणीही केली. यावेळी त्यांनी देण्यात येणाऱ्या सोयी, उपचार व व्यवस्थेचा आढावाही घेतला. पीपीई कीटचा वापर करून मुंढेंनी काही रूग्णांशी संवादही साधला.
सोमवारी सीताबर्डी बाजारपेठांमध्ये मुंढे यांनी स्वत: जाऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. लॉकडाउनमध्ये शिथिलता दिली याचा अर्थ नियम पाळायचे नाही असा होत नाही. शासनाच्या दिशानिर्देशांचे पालन करा, नियम पाळा अन्यथा मोठी कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.
यात त्यांनी उपचार घेत असलेल्या काही पॉझीटीव्ह रूग्णांसोबत संवादही साधला. त्यांच्याकडून माहितीही घेतली. यावेळी त्यांना मेडीकल व मेयोतील डॉक्टरांनी माहिती दिली. मे अखेरपर्यत उपराजधानीत करोना नियंत्रणात होता. जून व जुलैमध्ये करोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुन्हा कडक लॉकडाउन वा संचारबंदी करण्याची वेळ आली आहे. अशात मनपाकडे अनेकांच्या नजरा आहेत. आयुक्त मुंढे काय निर्णय घेतात, यावर खल सुरू असतानाच त्यांनी आठवडयाभरापुर्वी मेडीकल व मेयोत उपचार घेत असलेल्या करोना केंद्राला आकस्मिक भेट दिली.
आनंदवार्ता! राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत पुण्याचा मृत्यूदर कमी
आयुक्त मुंढे यांच्या फेसबुक लाईव्हवर अनेक नागपूरकरांनी अनेक सूचना दिल्या. या सूचना नजरेखालून घालताना आयुक्तांकडून काही कारवाईही करीत आहेत. यातीलच एक भाग म्हणून या दोन्ही रूग्णालयातील कोव्हीड सेंटरची भेट असल्याचे बोलल्या जाते. प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थीती जाणून घेण्याचा प्रयत्नही यानिमीत्ताने होता. या पाहणीवेळी त्यांनी सोबत फार कमी अधिकाऱ्यांना सोबत घेतले. पाहणीनंतर या सेंटरला भेट दिल्याची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत काही दिवसानंतर दिली.