रेल्वेत पाळले जातेय सोशल डिस्टंसींग?
देशव्यापी लॉकडाउनदरम्यान भारतीय रेल्वेच्या सेवेने हळूहळू गती पकडणे सुरू केलेय. लॉकडाऊन दरम्यान रेल्वे बंद काळात कोरोना विषयक जागरूकतेसाठी कैक उपाय योजना पाळल्या गेल्या व अनेक कडक नियम बनले पण पुढेही यांचे पालन केले जाईल काय?
सर्व ट्रेनसिटचे बुकिंग फुल्ल, सुरक्षा, सावधगिरीचे काय?
नागपूर. देशव्यापी लॉकडाउनदरम्यान भारतीय रेल्वेने हळूहळू गती पकडणे सुरू केलेय. लॉकडाऊन दरम्यान रेल्वे बंद काळात कोरोना विषयक जागरूकतेसाठी व फैलाव आटोक्यासाठी कैक उपाय योजना पाळल्या गेल्या व अनेक कडक नियम बनले यातील सोशल डिस्टंसींग नियमास कायम ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु स्वत: रेल्वे प्रशासनच याबाबत आता ईकडे आड तिकडे विहीर अशा पेचात सापडल्याची स्थिती उद्भवली दिसते आहे.
एकीकडे स्टेशन परिसरात प्रवेशासाठीचे अल्प प्रवाशांत रेल्वे सुरक्षा बलातर्फे सोशल डिस्टंसींग सक्ति केली जातेय तर दुस-या बाजूस 1 जूनपासून सुरू होणा-या 200 ट्रेन्समधे सर्व बुकिंग खुली केलेली आढळतेय, सर्व सीटस् बुकही झाल्यायत. म्हणजे आता प्रवासी 1 मिटर अंतराऐवजी 1 फूटही अंतर डिस्टंसींग पाळू शकतील वा नाही अशी वेळ आलीय.
नागपूर स्थानकावरही प्रवेश द्वार ते प्लॅटफॉर्मवर प्रत्येक कोचनिहाय 1-1 मिटर वर चिन्हांकन केलेले आहे. शुक्रवारपासून सुरू आरक्षित तिकिट काउंटर वर देखील अशाच प्रकारे चिन्हांकन केलेले आहे. पण प्रवासी कोचात दाखल झाले तर ही डिस्टंसींग लोप पावेल कारण बर्थवर अर्ध्या मिटरवर त्यांना सहप्रवासी लाभणार असतील, अश्या प्रकारे स्टेशनपासून सुरू ही सोशल डिस्टंसिंग कोचात जाऊन -हास पावणार. नागपूरप्रमाणेच देशातील इतर सर्व स्थानकांवरही हाच देखावा आहे.
स्वगृहीच तुटतायत नियम:
रेल्वेने सक्तीचा नियम बनवलाय, प्रत्येक प्रवाश्याची थर्मल स्क्रीनिंग होईल. शारीरिक तापमान सामान्यपेक्षा जराही जास्त आढळले तरी प्रवास करता येणार नाही. श्रमिक स्पेशल आणि राजधानी स्पेशल नंतर 1 जून पासून अधिक ट्रेन संख्येने अधिक प्रवाश्यांची रहदारी वाढेल. अशात लोको पायलट, टीटीई, गार्ड्स, आरपीएफ जवानांसाठी सावधगिरी आणि धोक्यातही जास्त वाढ होणार. प्रत्येक प्रवाश्यांची स्क्रीनिंग करणा-या रेल्वे प्रशासनाने अद्याप रेल्वे कर्मचारी किंवा सुरक्षा कर्मचार्यांची स्क्रीनिंग केलेली नाही.
प्रवाश्यांना कोरोनापासून बचावासाठी क्राउड मॅनेजमेंटवर अधिक जोर दिला गेला परंतु त्यासह स्वत:चे कर्मचार्यांसाठी क्राईसेस मॅनेजमेंटवर देखील लक्ष हवे. स्थानकांवर सोशल डिस्टेंसिंग पालनाचा उपाय नागपूर स्थानकावर यथायोग्य रूजूवल्या जात होता, मात्र रेल्वेत बसताक्षणीच त्याचा बट्टयाबोळ होतो आहे.
रनिंग स्टाफसह १२-१२ तास कार्यरत असणा-या आरपीएफच्या जवानांपैकी कोणाचीही आरोग्य तपासनीची नोंद झालेली नाही, या काळात लाखोंच्या आसपासच्या नागरिक, प्रवाश्यांबरोबर त्यांचा संबंध आलाय व हा क्रम सुरूच आहे. कोरोना संसर्गकाळातील शारीरिक थकवा रेल्वेकर्मचारी आणि सुरक्षाकर्मचा-यांस मोठा धोका पोहोचवू शकतो. या सर्वांमुळे रेल्वेंतर्गतच कोरोना बाँब फुटेल कि काय? असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
1 जून पासून कायम असतील नियम
- प्रवाशांना प्रवासाआधीच 90 मिनिटांपूर्वी स्थानकावर पोचणे सक्तीचे.
- प्रत्येक प्रवाशाची थर्मल स्क्रीनिंग होईल.
- लक्षणे नसलेल्या प्रवाश्यांसच प्रवासाची परवानगी असेल.
- स्थानकावरून परत पाठविल्यास संपूर्ण भाडे राशीचा परतावा मिळेल.
- वातानुकूलित कोचांत चादर वा ब्लँकेटची सुविधा नाही.