‘जनसंवाद कार्यक्रम ‘ पालकमंत्री सोडवणार जनतेच्या समस्या
नागपूर दि. १२ : सामान्य जनता व प्रशासन यातील अंतर कमी होण्यासाठी पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी, 11.00 वाजता, जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे पहिल्या जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्या 13 मे रोजी या संदर्भातील लिखित समस्या मागविण्यात आल्या असून १४ मे रोजी वेळेवर येणाऱ्या सर्व समस्यांना ही समाविष्ट करण्याचा प्रशासन प्रयत्न करत आहे.
कोणतीही समस्या असो, अगदी महानगरपालिकेपासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आणि नगरपंचायत पासून जिल्हा परिषदपर्यंत या जनसंवाद कार्यक्रमात जनतेला थेट पालक मंत्र्यांशी संवाद साधता येणार आहे. जिल्ह्यास्तरीय वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नागरीकांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे.
नागरिकांनी या संधीचा फायदा घ्यावा, लोकशाहीमध्ये असलेल्या अधिकाराचा वापर करावा व आपले प्रश्न या व्यासपीठावर सोडून घ्यावे असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.
• जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखेत लेखी अर्ज करा
• वेळेवरही समस्या मांडण्याची मिळेल संधी
• बचतभवनातील संवादासाठी प्रशासन सज्ज
• महानगर व जिल्ह्याच्या समस्या मांडता येतील
• सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील
• लेखी अर्जासह उपस्थित राहण्याचे आवाहन