शिवसेनेचे किशोर कुमेरिया यांच्या केवळ एकमेव आक्षेपाला मंजुरी
नागपूर महापालिकेच्या प्रभागरचनेवरील १३१ आक्षेपांवर सुनावणी झाल्यानंतर केवळ शिवसेनेचे नगरसेवक किशोर कुमेरियांचा एकमेव आक्षेप मंजूर झाला आहे. अंतिम प्रभाग रचना १० मार्चला जाहीर होणार आहे. नागपूर महापालिकेच्या प्रभागांचे प्रारूप आराखडझालेल्या २१ फेब्रुवारीला सुनावणीत आलेल्या एकूण १३१ आक्षेपांवर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी घेण्यात आली होती.
त्यात केवळ एका आक्षेपाची समितीच्या बतीने दखल घेण्यात आली आहे. यात माजी उपमहापौर व शिवसेनेचे नगरसेवक किशोर कुमेरिया यांनी नोंदवलेल्या आक्षेपाची दखल घेण्यात आली आहे. नव्या प्रभाग रचनेत यंदा शहरात ५२ बॉर्ड असतील. कुमेरिया यांनी नोंदवलेल्या आक्षेपानुसार चिटणीस नगर आणि धन्वंतरी नगर या भागातील घरे वॉर्ड २९ आणि वॉर्ड ४८ मध्ये विभागली गेली आहेत. त्यामुळे या दोन भागांना दोन वेगळे नगरसेवक असतील. त्यामुळे या भागातील घरे एका बॉडत आणावीत असे त्यांनी आक्षेपात म्हटले. त्याचबरोबर सीमांकन निश्चित करण्यासाठी असलेल्या उमरेड महामार्गाची हद आहे. यात उजव्या बाजूला वस्त्यांची संख्या सर्वाधिक आहे. तर डाव्या बाजूला केवळ दोन वस्त्या आहेत. या दोन चरत्या वॉर्ड ४८ मध्ये समाविष्ट केल्या होत्या. या वस्त्यानाही बाँई २९ मध्ये समाविष्ट करावे, असाही आक्षेप त्यांनी नोंदवला होता. यानुसार समितीने हे बदल केल्याची माहिती आहे. प्रभागरचनेचे अंतिम प्रारूप १० मार्च रोजी जारी होणार आहे.