कोवीड१९: संख्या हजार पार, कालही नव्याने आढळले ५० वर बाधित
नागपूर:- नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या कमाल दिशेने वाटचाल करतांनाचे चित्र आहे, पॉझिटिव्हांची संख्या कमी होण्याऐवजी झपाट्याने सतत वाढत आहे, काल पॉझिटिव्हची संख्या हजाराच्या वर गेली आहे, एकुण १०४१ रूग्णसंख्या नोंद कालपर्यंतची आहे. नागपुरात एकाच दिवसात ८६ कोरोना पॉझिटिव्हांचीही नोंद मागेच झाली आहे.
नागपुरात आत्तापर्यंत एकूण ५० नवे पॉझिटिव्ह आढळले आहेत. नागपूरच्या वेगवेगळ्या भागातील चाचणीत लोक सकारात्मक आढळल्यानंतर आता नागपुरातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह संख्या १०४१ वर पोचली आहे. यात नाईक तलावातील १७ आणि नरसाळ्यातील १ असे जे पूर्वीपासून विलग ठेवलेले होते, अशांचा समावेश आहे.
पुन्हा दिवसभरात ईतर भागातील रूग्णसंख्येचा जोड होत गेला ज्यात तीन नल चौक २, नाईक तलाव १७, आठवा माईल २, चंद्रमनी नगर ४, नरसाळा १, झाड़ीवाला ले-आउट १, आर्य नगर १, हुडकेश्वर १, आर टि पी एस २, निर्मल कालोनी १, मंगलवारी चिचघरे मोहल्ला १, निकालस मंदिर २, बजेरिया भोईपुरा १, भीम नगर ३, मोमिनपुरा ५, हंसापुरी २, शांति नगर १, ईतवारी धान्य बाजार १, महाल १, खाजगी लॅब १, असे तब्बल ५० ची भर पडत, एकुण बाधितसंख्या १०४१ वर पोचली.