दारूविक्री दुकाने, मॉल उघडले, तर मंदिरेच का बंद: कोराडी मंदिरात घंटानाद आंदोलन
नागपूर:- या कोरोना काळात महाराष्ट्रातील सर्व मंदिरे, गुरुद्वारे, मशीदी सा-या बंद आहेत. दरम्यान, विश्व हिंदू परिषद आणि भाजपाने आज महाराष्ट्रभर विविध मंदिरांसमोर घंटानाद आंदोलन केले, नागपूरचे कोराडी श्रीमहालक्ष्मी मंदिरही कोरोनामुळे मार्चपासून सलग बंद आहे, आता मंदिर उघडण्यास्तव श्रीमहालक्ष्मी भक्तांनी चळवळीची भुमिका निवडली आहे, त्यासाठी आज घंटानाद आंदोलन मातेच्या मंदिरासमोर आयोजित करण्यात आले होते, या आंदोलनात भाजपचे आमदार आणि कार्यकर्ते सहभागी होते. येथे सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली आणि गाणी भजन गाऊन सरकारला जागवण्याचे कार्य करण्यात आले.
विरोध प्रदर्शन करणा-या भाविकांनी सांगीतले की सर्वजण मातेला भेटायला येत आहेत पण मंदिर बंद आहे, राज्य सरकार कुंभकर्णाच्या झोपेत आहे, राज्यात दारूची दुकाने उघडली आहेत, मॉल्स उघडली आहेत, परंतु धार्मिक स्थळे उघडली गेली नाहीत ज्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाताहेत. आंदोलकांचा असा विश्वास आहे की मंदिरे उघडली जावीत व त्यासाठी शासनाने वेगवेगळे मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत.